ETV Bharat / state

Sangli suicide case : मांत्रिक अब्बास बागवानच्या घरातून काळ्या जादूचे साहित्य जप्त

author img

By

Published : Jul 2, 2022, 7:26 AM IST

Updated : Jul 2, 2022, 8:36 AM IST

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे नऊ जणांची हत्या ( Sangli suicide case ) झाली होती. या प्रकरणात आरोपी मांत्रिक अब्बास बागवान ( Abbas Bagwan arrest sangli suicide case ) याच्या सोलापूर येथील घराची सांगली पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर झडती घेतली. बागवान याचे घर सोलापुरातील मुस्लीम पाच्छा पेठ येथील अपार्टमेंटमध्ये आहे. पोलिसांना झडतीत काळी विद्या ( Black magic material in Bagwan house solapur ) किंवा काळ्या जादूचे साहित्य आढळले.

Sangli family suicide
अब्बास बागवान आरोप सांगली हत्या प्रकरण

सोलापूर - सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ ( Sangli suicide case ) येथील नऊ जणांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ( Vhanmore family suicide ) मांत्रिक अब्बास बागवान याच्या ( Abbas Bagwan arrest sangli suicide case ) घराची सांगली पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर झडती घेतली. बागवान याचे घर सोलापुरातील मुस्लीम पाच्छा पेठ येथील अपार्टमेंटमध्ये आहे. सांगली पोलिसांच्या पथकाने संपूर्ण घराची कसून झडती घेतली. यामध्ये त्यांना काळी विद्या ( Black magic material in Bagwan house solapur ) किंवा काळ्या जादूचे साहित्य आढळले. सांगली पोलिसांनी सर्व साहित्य हस्तगत ( Sangli family death ) केले असून तपासासाठी सांगली येथे घेऊन गेले आहेत. गुप्तधनाचे आमिष दाखवून अब्बास बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवसे यांनी म्हैसाळ (सांगली-मिरज) येथील व्हनमोरे कुटुंबातील 9 जणांची हत्या केली, असा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे. दोघा संशयित आरोपींना 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Sangli suicide case : सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्याकांड; दोन मांत्रिकांनी दिलं जेवणातून विष

अब्बास बागवान हा अघोरी विद्येत पारंगत - अब्बास महंमदअली बागवान हा अघोरी विद्येत पारंगत होता. ही अघोरी विद्या यशस्वी होण्यासाठी तो अघोरी कृत्ये करत असल्याची माहिती त्याच्या घराशेजारी असलेल्या नागरिकांनी दिली. दर अमावस्या, पौर्णिमेला अब्बास बागवान अघोरी कृत्ये करत होता. याबाबत त्याच्या घरातील इतर सदस्यांना देखील माहिती होती. तसेच, सोलापुरातील त्याच्या इतर नातेवाईकांना देखील त्याच्या अघोरी कृत्यांबद्दल माहिती होती. मंत्र तंत्र पठण करत स्वतःचे विष्टान्न खाणे, इतर पुरुषांसोबत अनैसर्गिक संभोग करणे, इतर पुरुषांचे वीर्य प्राशन करणे, असे अनेक घाणेरडे कृत्य करत अघोरी विद्या यशस्वी करत असल्याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी दिली.

गुप्तधनाचे अमिश त्याने सोलापुरात देखील दाखवले होते - गुप्तधन काढून देतो, कोट्यवधी रुपयांचे गुप्तधन तुमच्या घराच्या जमिनीखाली आहे. त्यासाठी मंत्रतंत्र विद्येच्या सहाय्याने ते काढावे लागेल असे अमिश दाखवून त्याने सोलापुरातील अनेक नागरिकांना फसविले आहे. काही घटनांची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे, तर काही नोंद झाली नाही. 2009 साली सोलापूर शहरातील विजापूरवेस येथील एका प्रसिद्ध व्यावसायिकाला फसविले आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि हत्येचा प्रयत्न, असे गुन्हे जेलरोड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात नोंद झाले आहेत. पण, सबळ पुराव्याअभावी त्याची या खटल्यांतून निर्दोष मुक्तता देखील झाली आहे.

काळी विद्या करण्याचे साहित्य सांगली पोलिसांनी केले जप्त - सांगली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर सोलापुरात तळ ठोकून बागवानच्या घराची झडती घेतली. मुळेगाव रोडवरील सरवदे नगर येथील घर, बाशा पेठ येथील अपार्टमेंट येथील फ्लॅट या घरांची झडती घेण्यात आली. त्या ठिकाणी पोलिसांना काळी जादू करण्याचे साहित्य, जडिबुटी सारखे अनेक औषध वनस्पती, लाकडी दांडके आदी साहित्य सांगली पोलिसांनी हस्तगत केले आहे. अटक झाल्यापासून त्याची पत्नी, मुले गायब झाले आहेत.

अनेकांनी लांब राहणे पसंत केले - अब्बास बागवान बाबत अनेक नागरिकांना भोंदूबाबा असल्याची माहिती असल्याने त्यांच्यापासून अनेकांनी लांब राहणे पसंत केले होते. बागवान हा काही मोजक्या लोकांच्या संपर्कात होता. शुक्रवारी सांगली पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर हे आपल्या पथकासोबत सोलापुरात आले होते. रात्री उशिरापर्यंत मांत्रिक अब्बास बागवान याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले आणि सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाणे येथे माहिती देऊन रात्रीच सांगलीच्या दिशेने अब्बासला घेऊन रवाना झाले.

काय आहे प्रकरण? - मिरज तालुक्यातील म्हैसाळ याठिकाणी 20 जून रोजी गावातील नरवाड रोड, अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ही आत्महत्या असल्याचे समजले जात होते. मात्र, व्हनमोरे कुटुंबीयांची ही आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचं धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गुप्तधनाच्या प्रकारातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोन मांत्रिकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली ( 9 killed due to poisoning two arrested by sangli police ) होती.

सामूहिक हत्याकांड असल्याचे उघडकीस - मांत्रिक धीरज चंद्रकांत सुरवसे (वय 39 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट), अब्बास मोहम्मद अली बागवान ( वय वर्षे 48 रा. सर्वदेनगर, सोलापूर ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी मृतदेह ज्या पद्धतीने आढळून आले होते. त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे, पोलिसांनी हा घातपात आहे का? यादृष्टीने तपास सुरू केला होता. या तपासात व्हनमोरे कुटुंबाची आत्महत्या नसून सामूहिक हत्याकांड असल्याचे उघडकीस आले. व्हनमोरे कुटुंबीयांना विषारी औषध देऊन खून केल्याची माहिती दीक्षित गेडाम यांनी दिली होती. धक्कादायक माहिती म्हणजे, गुप्तधनाच्या लालसेपोटी वनमोरे कुटुंबीयांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

हेही वाचा - Sangli suicide : 2 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यूनंतर आई-वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Last Updated : Jul 2, 2022, 8:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.