ETV Bharat / state

Sangli suicide case : सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्याकांड; दोन मांत्रिकांनी दिलं जेवणातून विष

author img

By

Published : Jun 27, 2022, 7:41 PM IST

Updated : Jun 27, 2022, 9:21 PM IST

सांगलीत काही दिवसांपूर्वी कुटुबांतील 9 जणांनी आत्महत्या केली होती. मात्र, ही आत्महत्या नसून, हत्याकांड असल्याची माहिती पोलिसांनी दिली ( 9 killed due to poisoning two arrested by sangli police ) आहे.

Sangli suicide case
Sangli suicide case

सांगली - म्हैसाळ येथील बहुचर्चित सामूहिक आत्महत्या प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. व्हनमोरे कुटुंबीयांची ही आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचं धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला आहे. गुप्तधनाच्या प्रकारातून ही हत्याकांड केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोन मांत्रिकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली ( 9 killed due to poisoning two arrested by sangli police ) आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

मांत्रिक धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट), अब्बास मोहम्मद अली बागवान ( वय वर्षे 48 रा. सर्वदेनगर, सोलापूर ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी मृतदेह ज्या पद्धतीने आढळून आला होता. त्यावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी हा घातपात आहे का?, यादृष्टीने तपास सुरु केला होता. या तपासात व्हनमोरे कुटुंबाची आत्महत्या नसून सामूहिक हत्याकांड असल्याचं उघडकीस आले आहे. व्हनमोरे कुटुंबीयांना विषारी औषध देऊन खून केल्याची माहिती दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. धक्कादायक माहिती म्हणजे गुप्तधनाच्या लालसेपोटी वनमोरे कुटुंबीयांचे हत्या करण्यात आल्याचं समोर आले आहे.

  • Maharashtra | 2 people arrested in connection with the death of 9 people (members of the same family) in Mhaisal village on June 20. During probe, it was found that these 2 people had mixed some toxic substances in the food. So it's not a case of suicide but of murder: SP Sangli pic.twitter.com/XGo8BTqDo4

    — ANI (@ANI) June 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वेगवेगळ्या ठिकाणी आढळले होते मृतदेह - मिरज तालुक्यातील म्हैसाळ याठिकाणी 20 जून रोजी गावातील नरवाड रोड, अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पशु वैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा व्हनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा समावेश होता. डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक व्हनमोरे, आई आकताई यल्लप्पा व्हनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक व्हनमोरे, मुलगा आदित्य माणिक व्हनमोरे, पुतण्या शुभम पोपट व्हनमोरे यांचे मृतदेह नरवाड रोड, अंबिका नगर चौंडजे मळा येथील मणिक व्हनमोरे यांच्या घरात सापडले होते. तर, दुसऱ्या घरात पोपट यल्लप्पा व्हनमोरे, संगीत पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट व्हनमोरे याच्या घरात मृतदेह आढळून आले होते.

18 सावकारांना अटक - पोलिसांच्या तपासामध्ये माणिक व्हनमोरे आणि पोपट व्हनमोरे या दोघा भावांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली होती. ज्याच्यामध्ये काही व्यक्तींची नावं आणि सांकेतिक संख्येचा उल्लेख होता. तसेच, सावकारीच्या जाचातून विष पिऊन आत्महत्या केल्याचा मजकूर या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आला होता. त्यामुळे व्हनमोरे कुटुंबाने सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्या पार्श्वभूमीवर 9 जणांच्या कुटुंबाच्या सामुहिक आत्महत्येच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. तर, चिठ्ठीच्या आधारे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 25 सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी 18 सावकारांना अटक केली होती.

हेही वाचा - Sangli Family Suicide Case : सुसाइड नोटने वाढवली प्रकरणाची व्याप्ती; पोलिसांनी 11 जणांना घेतले ताब्यात

Last Updated :Jun 27, 2022, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.