ETV Bharat / state

रुपाली चाकणकर महिला असल्याचं व्हिक्टीम कार्ड खेळून राजकीय दबाव आणताहेत : प्रदीप कणसे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 9:45 PM IST

Pradeep Kanse On Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सोशल माध्यमातून अश्लील भाषेमध्ये कमेंट केल्यानं पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. (Pradeep Kanse criticism of Rupali Chakankar) यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांना चौकशीसाठी बोलवण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही. (obscene comments on Rupali Chakankar) रूपाली चाकणकर या महिला असल्याचं व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत, असे ते म्हणाले.

Pradeep Kanse On Rupali Chakankar
प्रदीप कणसे

सोशल मीडियावरील विवादित पोस्ट प्रकरणी बोलताना प्रदीप कणसे

पुणे Pradeep Kanse On Rupali Chakankar : रुपाली चाकणकर या राजकीय दबाव वापरून विचारधारेच्या लढाईला व्यक्तिगत लढाई करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा आरोपी कणसे यांनी केला आहे. (Sambhaji Brigade regional organizer) आपल्या विरोधात लढणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून खोट्या गुन्ह्यात अडकून आपला राजकीय फायदा करून त्या घेत आहेत. सगळा प्रकार अशा पद्धतीने होत आहे की, त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला होता; परंतु यात माझा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया प्रदीप कणसे यांनी दिली आहे. (Pradeep Kanse Pune PC)

बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभेच्छावरून झाला वाद : दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी रgपाली चाकणकर यांच्या फेसबुक पेजवरून बलिप्रतिपदा पाडव्याच्या शुभेच्छा देणारी पोस्ट करण्यात आली होती. संबंधित पोस्टमध्ये जे चित्र डिझाईन करण्यात आलं होतं त्यामध्ये वामन हा सम्राट बळीराजाच्या डोक्यावर पाय देत असल्याचं दाखवलं होतं. या चित्रामुळं सम्राट बळीराजाला श्रद्धास्थान मानणाऱ्या माझ्यासहित बहुजन समाजातील शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेत काम करणाऱ्या लाखो लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यात. त्यामुळे 14 नोव्हेंबरला मी माझ्या प्रदीप कणसे या फेसबुक अकाउंट वरून यांचं सोशल मीडिया कोण हाताळते व चित्र काय दर्शवते याचं आकलन करणारी सामाजिक पोस्ट केली होती. यात कुठेही मी त्यांची बदनामी केली नाही. परंतु आपल्या विरोधात बोलणाऱ्याला अडकवण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी कुठल्यातरी जुन्या गुन्ह्याचा संबंध माझ्याशी आहे का, हे पाहण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला आणि मला नोटीस पाठवली, असा आरोप कणसे यांनी केला आहे.

माझ्याविषयी खोट्या बातम्या दिल्या : पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन प्रदीप कणसे यांनी, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. केवळ राजकीय विरोध आणि राजकीय सत्तेचा गैरवापर करत असून त्यामुळे माझी बदनामी केली. माझ्याविषयी खोट्या बातम्या प्रसिद्धी माध्यमात दिल्या. त्यामुळे आज मी हा खुलासा करत असून आता त्यांनी म्हटलं आहे की, मी त्या पोस्टवरल्या कमेंटवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु पोस्टच्या कमेंटवर कुणाचंही नियंत्रण नसतं. हे फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांनी केलं असल्याचं आणि यापुढे संभाजी ब्रिगेड योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार करून त्याला उत्तर देईल. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी राज्यात अनेक ठिकाणी काही गैरप्रकार केले का, त्याचेही उत्तर संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीनं देणार असल्याचं प्रदीप कणसे म्हणाले.

हेही वाचा:

  1. 'लिव्ह इन रिलेशनशिप' एक आजार; त्याला वेळीच आळा घाला, भाजपा खासदाराची मागणी
  2. वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांमध्ये आजारात वाढ, आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला काय?
  3. अवकाळीने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान; नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी हवेत 62 कोटी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.