ETV Bharat / state

Sinhagad Express Fire : पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसला अचानक लागली आग

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 7:24 PM IST

पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यांना अचानक आग (Fire in Sinhagad Express) लागल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना आज (सोमवारी) दुपारी खंडाळा घाटात घडली असून पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलात प्रशिक्षणार्थी फायरमन (fire extinguished by trainee firemen) म्हणून कार्यरत असलेल्या तीन जवानांनी रेल्वे प्रवासात प्रसंगावधानता दाखवत तात्काळ आगीवर नियंत्रण (fire brought under control) मिळवले.

Fire Broke Out In Railway
ट्रेनी कर्मचाऱ्यांनी विझवली आग

आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान

पुणे Fire Broke Out In Railway: पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस (Fire in Sinhagad Express) या रेल्वेला लागलेली आग तात्काळ आटोक्यात आणून जवानांनी कर्तव्यनिष्ठा दाखवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळालीय. मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसनं पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलात प्रशिक्षणार्थी फायरमन म्हणून काम करणारे भूपेश पाटील, नितीन ससाणे आणि विजय पाटील प्रवास करीत होते. रेल्वे खंडाळा घाटातील पळसदरी येथे आल्यानंतर अचानक रेल्वेच्या चाकातून धूर निघत असल्याचं दिसून आलं. त्याचवेळी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना लायनर गरम झाल्याने ठिणग्या उडू लागल्याचं लक्षात आलं. तसेच धूर पसरत आग लागली होती.

प्रसंगावधान राखत रोखली आगीची घटना: यावेळी रेल्वेतून प्रवास करणारे ट्रेनी फायरमन यांनी रेल्वेतील अग्निरोधक उपकरणांचा वापर करून आग आटोक्यात आणली. दरम्यान, अचानक धूर येऊ लागल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेमुळे रेल्वेचं इंजिन जाम होण्याचा धोका होता. इंजिन जाम झालं असतं तर पुणे-मुंबई लोहमार्गावरील रेल्वेसेवा काही काळ ठप्प झाली असती. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत मोठी दुर्घटना रोखली. याबद्दल या तिन्ही जवानांचं कौतुक केलं जातय.

अहमदनगरमध्ये रेल्वे डब्यांना आग: आगीची अशीच एक घटना अहमदनगरमध्ये 16 ऑक्टोबर, 2023 रोजी घडली होती. यामध्ये नगर-आष्टी रेल्वेला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. नगर जवळ वाळूंज शिवारात दुपारी तीनच्या सुमारास लागलेली आग पाच डब्यात पसरली. आधीच उशीर झालेल्या गाडीत प्रवाशांची संख्या अत्यंत कमी होती. आग लागल्याचं कळताच गाडी थांबल्यानं सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले. तासाभरात आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, आगीत गाडीचं मोठं नुकसान झालं होतं. आता त्याचा धगधगता व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आष्टीला गेलेली ही पॅसेंजर गाडी नगरकडे परतत होती. नारायणडोह ते नगर या दरम्यान वाळंजू शिवारात नगर-सोलापूर महामार्गाच्या क्रॉसिंगजवळून जात असताना इंजिनच्या मागील डब्याला आग लागली.

हेही वाचा:

  1. परभणीच्या रेल्वे स्थानकात भीषण आग; कॅबिन, स्टोअररूम जळून खाक
  2. अमरावती पेट्रोल भरलेल्या वॅगनला भीषण आग; गार्डमुळे टळला अनर्थ
  3. Tourism Train Coach Fire : पर्यटक रेल्वे गाडीच्या डब्याला आग, मदुराईत ९ प्रवाशांचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.