ETV Bharat / bharat

Tourism Train Coach Fire : पर्यटक रेल्वे गाडीच्या डब्याला आग, मदुराईत ९ प्रवाशांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 8:17 AM IST

Updated : Aug 26, 2023, 1:07 PM IST

पर्यटकांच्या रेल्वे गाडीतील डब्याला लागलेल्या आगीत तब्बल ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मदुराई इथं घडली आहे.

Tourism Train Coach Fire
संपादित छायाचित्र

चेन्नई : लखनऊ ते रामेश्वरम या पर्यटक रेल्वे गाडीच्या कोचला लागलेल्या आगीत ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही गाडी मदुराई रेल्वे स्थानक सोडून एक किमी अंतरावर उभी होती. लखनऊ ते रामेश्वरम प्रवासास निघालेली ही गाडी मदुराई स्थानकात विसाव्यासाठी थांबण्यात आली होती. मात्र अचानक डब्याला आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली. यात अगोदर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आगीत मृत्यू झालेल्यांची संख्या ९ वर पोहोचली आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  • #WATCH | Tamil Nadu: Fire reported in private/individual coach at Madurai yard at 5:15 am today in Punalur-Madurai Express. Fire services have arrived and put off the fire and no damage has caused to another coaches. The passengers have allegedly smuggled gas cylinder that caused… pic.twitter.com/5H7wQeGu93

    — ANI (@ANI) August 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चहा बनवत होते पर्यटक : पर्यटकांच्या रेल्वे गाडीतील डब्याला आगीनं वेढल्यानं ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मदुराई रेल्वे स्थानकावर घडली आहे. या रेल्वेतील प्रवाशी गॅस सिलिंडरवर चहा बनवत होते. मात्र चहा बनवत असताना पोर्टेबल गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आग लागल्याची घटना घडल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

  • #WATCH | Tamil Nadu: "Today early morning at 5:30 am there was a fire accident in the coach which was halted here at Madurai railway station...They were pilgrims & were travelling from Uttar Pradesh. This morning when they tried to make coffee & tried to lit the gas stove, there… https://t.co/MgXuD4CDir pic.twitter.com/iDDBOmjIDX

    — ANI (@ANI) August 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लखनऊ ते रामेश्वरम पर्यटकांची रेल्वे गाडी : ही रेल्वे गाडी लखनऊ येथून काही पर्यटकांना घेऊन रामेश्वरमला निघाला होती. मात्र मदुराई स्थानकात ही रेल्वे गाडी थांबवण्यात आली होती. या रेल्वे गाडीत उत्तर प्रदेशातील अनेक प्रवाशी प्रवास करत होते. थांबा असल्यानं मदुराई स्थानकात काीह अंतरावर ही रेल्वेगाडी फलाटावर थांबवण्यात आली होती. मात्र चहा बनवताना ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गॅसवर कॉफी बनवल्यानं आग लागल्याची रेल्वे विभागाची माहिती : काही प्रवाशांनी गॅस आपल्यासोबत आणला होता. प्रवाशी गाडी रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर या गॅसवर कॉफी बनवण्यात येत होता. त्यामुळे आग लागल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. या प्रवाशांना सोबत गॅस वापरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, मात्र तरीही प्रवाशांनी गॅस सोबत आणून त्यावर कॉफी बनवण्यात येत असताना गॅसचा स्फोट होऊन आग लागल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

55 प्रवाशांना काढलं सुखरुप बाहेर : या डब्यातून अनेक प्रवाशी प्रवास करत होते. मात्र आग लागल्यानंतर घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला. रेल्वेच्या आपात्कालिन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्यानं मोठी जीवितहानी टळली. आपात्कालिन जवानांनी 55 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं. यातील काही गंभीर प्रवाशांना रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या डब्यात होरपळून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह राजाजी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम एस संगीता यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

हेही वाचा -

  1. Death of a protester in Telangana: तेलंगणात एका आंदोलकाचा मृत्यू
  2. कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग; जीवितहानी नाही
Last Updated : Aug 26, 2023, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.