ETV Bharat / state

कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग; जीवितहानी नाही

author img

By

Published : Jun 9, 2021, 12:59 PM IST

Updated : Jun 9, 2021, 1:22 PM IST

कोकण रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशन डब्याला भीषण आग;
कोकण रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशन डब्याला भीषण आग;

कोकण रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशन डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील झाराप-कुडाळ रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली.

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोकण रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आग लागली आहे. या आगीत कोच जाळून खाक झाला आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव काहीवेळ कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती ती आता सुरळीत सुरु झाली आहे.

कोकण रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशन डब्याला भीषण आग;
कोकण रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशन डब्याला भीषण आग;

रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग

कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आज सकाळी साडे नऊच्या सुमारास आग लागली. झाराप स्टेशन जवळ ही आग लागली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग विझविण्यासाठी कुडाळ एम आय डी सी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर आता नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीमुळे कोकण रेल्वे वरील वाहतूक सुरक्षितते साठी काही काळ थांबवण्यात आली होती. रेल्वे वाहतूक साडे अकरा वाजता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग
कोच जळून झाला खाकझाराप रेल्वे स्टेशन परिसरात विद्युत दुरुस्ती गाडीच्या डब्याला आग लागली. या आगीत डबा पूर्णत: जळून खाक झाला आहे. हा प्रकार आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे. सावंतवाडी पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. दरम्यान मालवाहतूक करणारा डबा असल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग
विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीतदरम्यान या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणासाठी काही वेळ कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ त्यहंबविण्यात आली होती. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. रेल्वे वाहतुकीला या घटनेचा कोणताही धिक नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Last Updated :Jun 9, 2021, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.