ETV Bharat / state

Drug Seized In Pune : पुण्यात 14 कोटींचे ड्रग्ज जप्त; 504 आरोपींना अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 10:38 PM IST

पुणे पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं ऑक्टोबर 2023 पर्यंत 9 हजार 355 किलो 68 ग्रॅम वजनाचे आमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या आमली पदार्थाची एकून किंमत 14 कोटी 55 लाख 34 हजार 223 रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 504 आरोपींना अटक केली आहे.

Drug Seized In Pune
Drug Seized In Pune

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस तसंच पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालनं आमली पदार्थ तस्करांकडं मोर्चा वळवला आहे. पुणे पोलिसांनी ऑक्टोबर 2023 पर्यंत 409 प्रकारच्या कारवाईत 9 हजार 355 किलो 68 ग्रॅम वजनाचे आमली पदार्थ जप्त केले आहे. या आमली पदार्थाची एकून किंमत 14 कोटी 55 लाख 34 हजार 223 रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत504 आरोपींना अटक केली आहे.

अंमली पदार्थासाठी सरकारची मोहिम : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी मोहिम राबवली जात आहे. जिल्हाधिकाराच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी केंद्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उप वनसंरक्षक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सहा. केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त, उपविभागीय दंडाधिकारी, अन्न औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त, केंद्रीय नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक, पुणे पिंपरी चिंचवड शहर प्रतिबंधक कक्षाचे अधिकारी, असे एकूण 13 सदस्य आहेत. समितीची प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येते.

अंमली पदार्था वापराबाबत समिती : जिल्ह्यातील अंमली पदार्थाचा वाढता वापर तसंच अंमली पदार्थाची समस्या सुलभरित्या हाताळून त्यावर प्रभावी कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून समिती कामकाज करत आहे. अंमली पदार्थांची होणारी बेकायदेशीर तस्करी, लागवड, वापर, विक्री, सेवन याबाबत पोलीस विभागाच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते आहे. वनविभाग तसंच कृषी परिसरात अंमली पदार्थाच्या वनस्पतींची बेकायदेशीर लागवड होवू नये, याकरीता वनविभाग, कृषी विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांनी देखील प्रतिबंधीत अंमली पदार्थाच्या वनस्पतींची लागवड करू नये, याबाबत जनजागृती करण्यात येते आहे. शालेय शिक्षण विभाग, जिल्हा शल्यचिकीत्सकामार्फत शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाच्या सेवनामुळं होणारे दुष्परिणाम, आर्थिक नुकसान याबाबत जनजागृती सुरू आहे. तसंच शाळा, महाविद्यालयात समन्वयक नेमण्यात आले आहेत.

अंमली पदार्थ दिनानिमित्त जनजागृती : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात मॅरेथॉन, पथनाट्ये, रॅली, शाळा-महाविद्यालयात व्याख्याने, शिबीर आयोजित करण्यात आली होती. समाजकल्याण विभागाच्यावतीनx व्यसन मुक्ती केंद्र, पुनवर्सन केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत असून त्यांना येणाऱ्या अडचणीबाबत सहकार्य करण्यात येत आहे. अन्न, औषध प्रशासन विभागाकडून औषध उत्पादित करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्यात येत आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ सनियंत्रण केंद्र समिती काम करीत आहे. अंमली पदार्थाचे बेकायदेशीर तस्करी, विक्री, लागवडीबाबत माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याला किंवा समितीला माहिती द्यावी, असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे.

हेही वाचा -

  1. MD Drugs Seized : नाशिक पोलिसांकडून एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, 10 कोटींचा एमडीचा साठा जप्त
  2. Drug Addicts Rebirth Celebration: व्यसनमुक्त झालेल्या लोकांचा नागपूर पोलिसांनी केला साजरा पुनर्जन्म वाढदिवस
  3. Narcotics Seized In Pune : 'उडता पंजाब' नंतर आता 'उडता पुणे'; 5 महिन्यात 'एवढ्या कोटीचे' अंमली पदार्थ जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.