ETV Bharat / state

Narcotics Seized In Pune : 'उडता पंजाब' नंतर आता 'उडता पुणे'; 5 महिन्यात 'एवढ्या कोटीचे' अंमली पदार्थ जप्त

author img

By

Published : Jun 1, 2023, 8:48 PM IST

सांस्कृतिक राजधानी पुणे जिल्ह्यात जानेवारी ते मे 2023 या पाच महिन्यात पुणे पोलिसांनी तब्बल 7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच 50 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 75 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी जवळपास 205 किलो अंमली पदार्थ जप्त केले. त्यामुळे 'उडता पंजाब' नंतर आता 'उडता पुणे' असे म्हणायची वेळ आली आहे.

Narcotics Seized In Pune
अंमली पदार्थ जप्त

जप्त ड्रग्जबाबत पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

पुणे: पोलिसांकडून मागील पाच महिन्यात कोकेनचे 4 गुन्हे दाखल झाले. यात 198 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून यात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर गांजाच्या बाबतीत 18 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 184 किलो गांजा जप्त केला गेला. यात 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ब्राऊन शुगर / हेरॉईनचा एक गुन्हा दाखल झाला. 336 ग्रॅम ब्राऊन शुगर / हेरॉईन जप्त करण्यात आली. यात एका आरोपीला अटक करण्यात आली. हेरॉईनची किंमत ही 4 लाख 33 हजार 200 रुपये एवढी आहे. कारवाई दरम्यान अफिमचे बोंडे / दोडाचुरा 5 किलो जप्त करण्यात आले आहे. या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

एवढे ड्रग्ज जप्त: चरस बाळगण्याचे एकूण 4 गुन्हे दाखल झाले असून तब्बल 3 किलो 285 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. तर यात 6 आरोपींना अटक करण्यात आली. जप्त चरसची किंमत जवळपास 42 लाख 68 हजार 940 एवढी आहे. तसेच मेफेड्रोनचे (एम.डी.) 17 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 1 किलो 717 ग्रॅम एम. डी. जप्त करण्यात आले. यात 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याची साधारणतः किंमत ही 3 कोटी 43 लाख 79 हजार 400 रुपये इतकी आहे. एल.एस.डी. बाबत एक गुन्हा दाखल केला गेला. यात 9 मिलिग्रॅम एल.एस.डी. ताब्यात घेण्यात आले. यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. एम.डी.एम.ए. बाबत एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 13 ग्रॅम एम.डी.एम.ए जप्त केले. याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कॅथा इडुलिस (खत) बाबत 2 आरोपींना अटक केली गेली.

नागरिकांना आवाहन: गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थाची जी तस्करी होत आहे त्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. शहरात या पाच महिन्यात जवळपास 7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. हे पदार्थ शरीराला घातक असून यामुळे कॅन्सर देखील होण्याची शक्यता आहे. अशी तस्करी आढळून आल्यास तात्काळ पुणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

हेही वाचा:

  1. Pune Crime : धक्कादायक! मटण केले नाही म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला
  2. Accident News : भरधाव रिक्षाचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात; रिक्षा खड्ड्यात पडली, ३ जणांचा मृत्यू
  3. Jalgaon Crime: स्टेट बँकेवर भरदिवसा दरोडा; १५ लाखांची रोकड केली लंपास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.