ETV Bharat / state

CM on Uddhav Thackeray : 'आम्हाला वाटलं होतं सत्ता गेल्यानंतर ते लाईनवर येतील'; ठाकरेंच्या ऑनलाइन सभेवर मुख्यमंत्री शिंदेंची खोचक टीका

author img

By

Published : Feb 24, 2023, 8:09 PM IST

Updated : Feb 24, 2023, 8:22 PM IST

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी ऑनलाईन सभा घेतली. यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आम्हाला वाटले होते की सत्ता गेल्यानंतर ते लाईनवर येतील, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. ते कसबा पोटनिवडणूकीतील प्रचाराच्या जाहीर सभेत बोलत होते.

Kasaba Bypoll
Etv Bharat

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभेत बोलताना

पुणे: राज्यात सत्तासंघर्षनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमचे जुने नेते त्यांनी काल पुण्यात ऑनलाईन सभा घेतली. आम्हाला वाटले होते सत्ता गेल्यानंतर ते लाईनवर येतील. त्यांना कोणी सांगितले की तुम्ही ऑनलाईन सभा घ्या. कारण हेमंत रासने हेच ही निवडणूक जिंकणार आहेत, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र: कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोड शो समाप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी जाहीर सभा घेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह विरोधकांवर जोरदार टीका केली.

अजित पवारांवर टीका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा शेतकरी पाणी मागतो तेव्हा हे काय दाखवतात. हे आपण पाहिले आहे. जाऊ द्या मी बोलत नाही अशा लोकांकडून काय आपण अपेक्षा करणार आहे. अजित पवार म्हणतात, मुख्यमंत्री यांनी सभा घ्यायची? पण एकनाथ शिंदे हा सामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी आज रोड शो केला आहे.

मागील 60 वर्षांचा हिशेब द्या: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज मी एमपीएससीचे विद्यार्थ्यांना सांगतो आम्हाला श्रेय घ्यायचे नाही. आमची भूमिका ही विद्यार्थ्यांची भूमिका आहे. मी जे बोलतो ते करून घेतो, आम्ही चुकीचे कुठे जात नाही आम्ही नदीवर जाऊन तसेच कुठेही जाऊन प्रायश्चित करायला गेलो नाही. आज विरोधी पक्षातील नेते आम्ही सात महिन्यात काय केले असे विचारत आहेत. पण तुमचे पुण्यात ६० वर्ष सत्ता होती. काय केले याचे हिशोब द्या, असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुक्ता टिळकांच्या आठवणींना उजाळा: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कसबा मतदार संघात आज कोणालाही वाटले नव्हते या पोट निवडणुकीला सामोरे जावे लागेल. मला आठवत आहे की मुक्ताताई यांनी आजारी असून सुद्धा या भागातील समस्या मांडल्या होत्या. तसेच विधानपरिषद निवडणूकीच्या मतदानाला सुद्धा त्या आल्या होत्या. आज या पोटनिवडणुकीत बापट साहेबांना पण मी सांगितल होते की तुम्ही प्रचाराला येऊ नका, पण कार्यकर्ता असल्यामुळे ते बाहेर आले. त्यांच्यातील कार्यकर्ता शांत झाला नाही, असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जनता उत्तर देईल: कसबा आणि चिंचवडमधील ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. शरद पवार आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील निवडणूक बिनविरोध करा, असे आम्हाला म्हणाले आणि आम्ही तेव्हा ते मान्य केले. कारण ही आपली संस्कृती आहे.आणि भरलेला अर्ज मागे घेतला. पण इथ तसे झाले नाही. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून या खालच्या प्रकारचा जो प्रचार सुरू आहे त्याला जनता २६ रोजी उत्तर देईल, असे देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

रॅलीला जोरदार प्रतिसाद: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एकीकडे कसबा गणपती आहे आणि यासमोर बापट साहेबांचे कार्यालय आहे. आपले उमेदवार हेमंत रासने जिंकून आले आहे, असे म्हणा आत्ता आपल्याला रासने यांना निवडून आणायचे आहे. आज आपण पाहिले की ४ तासापासून ही प्रचार रॅली संपूर्ण मतदारसंघात काढली आणि आज याचा समारोप झाला आहे. आजच्या रॅलीला जो प्रतिसाद या भागातील लोकांनी दिला त्यांना मी कोटी कोटी नमन करतो व वंदन करतो. कारण रस्त्यावर पण तेवढेच आणि गॅलरीमध्ये पण तेवढेच सगळीकडे माणसे दिसत होती. मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा: Next CM Banner : भावी मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीमध्ये धुसफुस? बॅनर लावणाऱ्याचे शरद पवारांनी टोचले कान

Last Updated : Feb 24, 2023, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.