ETV Bharat / state

Next CM Banner : भावी मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीमध्ये धुसफुस? बॅनर लावणाऱ्याचे शरद पवारांनी टोचले कान

author img

By

Published : Feb 24, 2023, 6:50 PM IST

मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफुस
मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफुस

भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीन नेत्यांची बँनरबाजी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांमध्ये प्रतीस्पर्धा सुरु आहे की काय अशी चर्चा सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बॅनरबाजी म्हणजे बालिशपणाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफुस

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून राज्यात मोठे राजकारण झाले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यातील 25 वर्षांची युती मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने तुटली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र, उद्धव ठाकरेंनी केवळ मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या दावनीला शिवसेना बांधल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी : महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून एवढे राजकारण होत असताना, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भविष्यात मुख्यमंत्री कोण होणार, यासाठी धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश कार्यालयाबाहेर अजित पवार, जयंत पाटील यांच्यात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांची अज्ञात्तांकडून बॅनरबाजी करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादीत मतभेद आहेत का? असा चर्चा सध्या राजकीय पक्षांमध्ये सुरु आहेत.


भावी मुख्यमंत्री कोण? : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा भावी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारणही तसेच आहे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असल्याचे राजकीय वर्तुळात सर्वश्रुत आहे. मात्र, 16 फेब्रुवारीच्या एक दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुंबईतील एनपीएमसी रोडवरील निवासस्थानी भावी मुख्यमंत्री म्हणुन बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे अजित पवारांना पर्याय म्हणून जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्वोच्च मंत्रिपदाचे उमेदवार आहेत का? अशी चर्चा सुरू झाली होती.

बॅनरबाजी केवळ पोरकटपणा : मात्र, दोन दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित करणारे बॅनर लावण्यात आला होते. त्यानंतर सुप्रिया सुळे स्वतः राज्याच्या भावी मुख्यमंत्री होणार, असे बॅनर प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री होण्याची स्पर्धा सुरू आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. मात्र, शरद पवारांनी यावर टीका केली आहे. हे बॅनरबाजी केवळ पोरकटपणा असल्याचे म्हटले आहे. काही जणांकडून चुकीचे काम होत आहे. आमच्या पक्षात कोणतीही स्पर्धा नाही अशी प्रतिक्रीया त्यानी दिली.




अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा : प्रत्येक नेत्याची राजकीय महत्त्वाकांक्षा असते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा राहिली आहे. ती महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनाही उच्च पदे मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असते. प्रत्येक पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी किंवा अन्य महत्त्वाच्या पदासाठी दोन किंवा अधिक दावेदार असतात.

मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच : त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये वेळोवेळी स्पर्धा पाहायला मिळते. मात्र, कोणताही नेता त्याचा थेट उल्लेख करण्याचे टाळतो. मात्र, त्या नेत्यांच्या समर्थकांकडून अशा पद्धतीची मागणी केल्याने वेळोवेळी बॅनरबाजी होत असते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच होणार का? याची चर्चा सुरू आहे. नेत्यांमधील ही लढाई काही वेळा पक्षासाठी धोकादायक असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Gautami Patil Programme : लावणी स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पोलिसांनी प्रेक्षकांना चोपले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.