ETV Bharat / state

कोल्हावाडीच्या ग्रामस्थांची व्यथा.. रस्त्याअभावी पोहत गाठावा लागतो तालुका

author img

By

Published : Oct 29, 2019, 1:22 PM IST

Updated : Oct 29, 2019, 2:30 PM IST

कोल्हावाडी गावात रस्त्या अभावी नागरिकांची गैरसोय

मानवत तालुक्यातील कोल्हावाडी या गावातून जाणारा रेल्वेपटरी खालचा भुयारी मार्ग परतीच्या पावसाने आठ ते दहा फूट पाण्याखाली गेला आहे. यामुळे तीन गावातील लोकांना पाण्यातून पोहत तालुका किंवा जिल्ह्याला जावे लागत आहे..

परभणी - जिल्ह्यातील मानवत तालुक्याच्या आदर्श ग्राम कोल्हावाडीसह देवगाव आणि आंबेगाव या तीन गावांत जाण्यसाठी रेल्वे रुळाखालून तयार करण्यात आलेल्या भुयारी पुलाचा वापर करावा लागतो. मात्र या वर्षी दिवाळीत पाऊस पडत असल्याने या भुयारी पुलात डोक्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून पोहत तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी जावे लागत आहे. परिणामी प्रशासनाच्या नावाने या तिन्ही गावात ऐन दिवाळीत 'शिमगा' होताना दिसत आहे.

रस्त्याच्या समस्येबाबत बोलताना कोल्हावाडी गावचे गावचे विद्यमान सरपंच अ‌ॅड. गोविंद उर्फ विठ्ठल भिसे

हेही वाचा... 'परतीच्या पावसाचा फटका; विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही भरपाई द्या'

परभणी जिल्ह्यात भर मोसमात पावसाने त्रास दिला नाही पण आता परतीचा पाऊस लोकांना बेजार करत आहे. मानवत तालुक्यातील कोल्हावाडी या गावातून जाणारा रेल्वेरुळांखालचा भुयारी मार्ग हा परतीच्या पावसाने आठ ते दहा फूट पाण्याखाली गेला आहे. यामुळे तीन गावातील लोकांना या पाण्यातून पोहत तालुका किंवा जिल्ह्याला यावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या नावाने या गावांमध्ये शिमगा होत असून लवकरात लवकर पर्यायी रस्ता करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा... परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्त्यासाठी अर्धनग्न बोंबमारो आंदोलन

कोल्हावाडीसह देवगाव आणि आंबेगावला या पूर्वी विनाफाटक असलेल्या रस्त्यावरून जावे लागत असे. मात्र तीन वर्षापूर्वी या गावात जाण्यासाठी भुयारी पुल करण्यात आला. त्या वेळी गावचे विद्यमान सरपंच अ‌ॅड. गोविंद उर्फ विठ्ठल भिसे यांनी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठांना या विषयी निवेदन देऊन भुयारी पूल नको, असे लेखी निवेदन देवूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. मागील दोन चार वर्षे कोरडा दुष्काळ असल्याने या विषयीचा त्रास लोकांना जाणवला नाही. पण आता परतीच्या पावसाने भुयारी मार्गात सात ते आठ फूट पाणी साचले आहे. या पाण्यातून वाहन घेऊन ग्रामस्थांना जाता येत नाही. परिणामी, ग्रामस्थांचा बाहेर गावी जाण्याचा पर्याय तुटला आहे. आता दिवाळीच्या सुट्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही. मात्र ही स्थिती अशीच राहिली तर आजारी माणसांचं काय? पोहत जाणे हा पर्याय नाही. त्यामुळे या तीन गावातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान, भिसे यांनी आता पर्यंत तीन वेळा ग्रामपंचायतीचे ठराव वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला नांदेड, औरंगाबाद येथे जाऊन दिले, निवेदने दिली. मात्र या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. हा प्रश्न प्रशासनाने त्वरित मार्गी लावावा, अन्यथा या विषयी तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नसल्याचे भिसे यांनी सांगितले.

Intro:
परभणी - भर मोसमात पावसाने त्रास दिला नाही. पण आता परतीचा पाऊस लोकांना बेजार करत आहे. मानवत तालुक्यातील कोल्हावाडी या गावातून जाणारा रेल्वेपटरी खालचा भुयारी मार्ग हा परतीच्या पावसाने आठ ते दहा फूट पाण्याखाली गेला आहे. यामुळे तीन गावातील लोकांना या पाण्यातून पोहत तालुका किंवा जिल्ह्याला यावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या नावाने या गावांमध्ये शिमगा होत असून लवकरात लवकर पर्यायी रस्ता करण्याची मागणी होत आहे.Body:जिल्ह्यातील मानवत तालुक्याच्या आदर्श ग्राम काेल्हावाडीसह देवगाव आणि आंबेगाव या तीन गावांना जाण्यासाठी रेल्वे रुळा खालून तयार करण्यात आलेल्या भुयारी पुलाचा वापर करावा लागतो. मात्र या वर्षी दिवालीत पाऊस पडत असल्याने या भुयारी पुलात डोक्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून पाेहत तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महत्वाच्या कामासाठी जावे लागत आहे. परिणामी प्रशासनाच्या नावाने या तिन्ही गावात एैन दिपावलीत शिमगा हाेताना दिसत आहे.
काेल्हावाडी सह देवगाव आणि आंबेगावला या पुर्वी विनाफाटक असलेल्या रस्त्या वरून जावे लागत असे. मात्र तीन वर्षा पुर्वी या गावात जाण्यासाठी भुयारी पुल करण्यात आला. या वेळी गावचे विद्यमान सरपंच अॅड गाेविंद उर्फ विठ्ठल भिसे यांनी या कामाला त्या वेळी रेल्वे प्रशासनाच्या वरीष्ठांना या विषयी निवेदन देऊन भुयारी पुल नकाे, असे लेखी देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. मागिल दाेन-चार वर्ष काेरडा दुष्काळ असल्याने या विषयीचा त्रास लाेकांना जाणवला नाही. पण आता परतीच्या पावसाने भुयारी मार्गात सात ते आठ फुट पाणी साचले आहे. या पाण्यातून वाहन घेऊन ग्रामस्थांना जाता येत नाही. परीणामी ग्रामस्थांचा बाहेर गावी जाण्याचा संपर्क तुटला आहे. आता दिपावली सुट्या आहेत. त्या मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान नाही, मात्र ही स्थिती अशीच राहिली तर आजारी माणसांचं काय? प्रत्येकाला पाेहता येतं, असं ही नाही. त्यामुळे या तीन गावातील नागरीकांची माेठी अडचन झाली आहे. दरम्यान, भिसे यांनी आता पर्यंत तीन वेळा ग्रामपंचायतीचे ठराव आणि वेळाेवेळी रेल्वे प्रशासनाला नांदेड, औरंगाबाद येथे जाऊन निवेदने दिली. मात्र या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. हा प्रश्न प्रशासनाने त्वरीत मार्गी लावावा, अन्यथा या विषयी तिव्र आंदाेलन छेडल्या शिवाय पर्याय नसल्याचे अॅड. विठ्ठल भिसे यांनी सांगितले.

सोबत :- vis & byte :- सरपंच विठ्ठल भिसे.Conclusion:
Last Updated :Oct 29, 2019, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.