ETV Bharat / state

'परतीच्या पावसाचा फटका; विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही भरपाई द्या'

author img

By

Published : Oct 27, 2019, 8:15 AM IST

Updated : Oct 27, 2019, 8:30 AM IST

जिल्ह्यात परतीचा पावसाच्या धुमाकूळात शेतकऱ्यांचचे प्रचंड नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला नाही, अशा शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार सुरेश वरपुडकर यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आ. सुरेश वरपुडकर

परभणी - जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. या पावसाचा तडाखा कापूस, सोयाबीन सारख्या पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी विमा भरला नाही. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा पाथरीचे नूतन आमदार सुरेश वरपुडकर यांनी केली आहे.

बोलताना आमदार सुरेश वरपुडकर

आमदार वरपूडकर यांनी या संदर्भात काल (रविवारी) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दरम्यान, या संदर्भात 'आपण जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्याशीही बोललो असून ते दिवाळीनंतर पंचनामे सुरू करणार असल्याची माहिती वरपूडकर यांनी दिली. तसेच प्रशासनाने ही नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील द्यायला वरपूडकर विसरले नाहीत. या पत्रकार परिषदेस मनपाचे गटनेते भगवानराव वाघमारे, रामभाऊ घाडगे, बंडू पाचलींग, नदीम इनामदार, माजी खासदार तुकाराम रेंगे आदी उपस्थित होते.


याप्रसंगी वरपूडकर यांनी कोंब फुटलेले कापसाचे पीक आणि बुरशी लागलेली सोयाबीनची झाडे पत्रकारांना दाखवण्यासाठी सोबत आणले होती. पुढे बोलताना वरपूडकर म्हणाले, प्रशासनाकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांनी अर्ज का करायचे ? त्यांना अर्ज करायची आवश्यकता नाही, असा मुद्दा देखील वरपूडकर यांनी उपस्थित केला. विमा कंपन्यांकडे हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. प्रशासनाकडे यादी आहे. मग त्यावरून शेतकऱ्यांना भरपाई देता येते.


आघाडी सरकारच्या काळात जोखीम स्तर दीडशे टक्क्यांवर होता. मात्र, या युतीच्या सरकारने जोखीम स्तर केवळ 70 टक्‍क्‍यांवर आणला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या लोकांना कितीही नुकसान झाले तरी त्याच्या 70 टक्केच भरपाई मिळते. हे शेतकऱ्यांचे नुकसान आहे. तसेच पंचनामे देखील मॅनेज असतात. विमा कंपन्यांशी सरकारी यंत्रणा संगनमत करते, असा आरोप देखील वरपूडकर यांनी केला. तसेच विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना जेवढे नुकसान भरपाई मिळेल तेवढेच नुकसान भरपाई विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरसकट देण्यात यावी, अशी मागणी देखील शेवटी वरपूडकर यांनी यावेळी केली.

Intro:परभणी - जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. या पावसाचा तडाखा कापूस, सोयाबीन सारख्या पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी विमा भरला नाही. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा पाथरीचे नूतन आमदार सुरेश वरपुडकर यांनी केली आहे.Body:आमदार वरपूडकर यांनी या संदर्भात आज (शनिवारी) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दरम्यान, या संदर्भात 'आपण जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांच्याशीही बोललो असून ते दिवाळीनंतर पंचनामे सुरू करणार असल्याची माहिती वरपूडकर यांनी दिली. तसेच प्रशासनाने ही नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील द्यायला वरपूडकर विसरले नाहीत. या पत्रकार परिषदेस मनपाची गटनेते भगवानराव वाघमारे, रामभाऊ घाडगे, बंडू पाचलींग, नदीम इनामदार, माजी खासदार तुकाराम रेंगे आदी उपस्थित होते. याप्रसंगी वरपूडकर यांनी कोंब फुटलेले कापसाचे पीक आणि बुरशी लागलेली सोयाबीनची झाडं पत्रकारांना दाखवण्यासाठी सोबत आणले होती. पुढे बोलतांना वरपूडकर म्हणाले, प्रशासनाकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांनी अर्ज का करायचे ? त्यांना अर्ज करायची आवश्यकता नाही, असा मुद्दा देखील वरपूडकर यांनी उपस्थित केला. विमा कंपन्यांकडे हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. प्रशासनाकडे यादी आहे. मग त्यावरून शेतकऱ्यांना भरपाई देता येते.
आघाडी सरकारच्या काळात जोखीम स्तर दीडशे टक्क्यांवर होता, मात्र या युतीच्या सरकारने जोखीम स्तर केवळ 70 टक्‍क्‍यांवर आणला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या लोकांना कितीही नुकसान झाले तरी त्याच्या 70 टक्केच भरपाई मिळते. हे शेतकऱ्यांचे नुकसान आहे. तसेच पंचनामे देखील मॅनेज असतात. विमा कंपन्यांशी सरकारी यंत्रणा संगनमत करते, असा आरोप देखील वरपूडकर यांनी केला. तसेच विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना जेवढे नुकसान भरपाई मिळेल, तेवढेच नुकसान भरपाई विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरसकट देण्यात यावी, अशी मागणी देखील शेवटी वरपूडकर यांनी यावेळी केली.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo & pbn_warpudkar_press_vis_byteConclusion:
Last Updated : Oct 27, 2019, 8:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.