ETV Bharat / state

Tulajbhavani Temple Gold Ornaments Melt : तुळजाभवानी मंदिरातील दागिने वितळवण्यास परवानगी; कसे वितळवणार दागिने?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 12:22 PM IST

Updated : Oct 7, 2023, 12:53 PM IST

Tulajbhavani Temple Gold Ornaments Melt : तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले दागिने वितळवण्यास आरबीआयनं परवानगी दिलीय. यामुळं आता 200 किलो सोनं वितळवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे यांनी दिलीय.

Tulajbhavani Temple Gold Ornaments Melt
Tulajbhavani Temple Gold Ornaments Melt

डॉ. सचिन ओम्बासे, अध्यक्ष मंदिर संस्थान

धाराशिव Tulajbhavani Temple Gold Ornaments Melt : तुळजाभवानीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले सोन्याचे दागिने नवरात्र संपल्यानंतर वितळवणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे यांनी दिलीय. यासाठी आरबीआयनं परवानगी दिली असून याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. देवी भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोनं, 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केलीय. यातील फक्त सोनं वितळवलं जाणार असून यातून 111 किलो शुद्ध सोनं मिळेल असा अंदाज प्रशासनाला आहे. यापूर्वी मंदिरसंस्थांकडं 47 किलो शुद्ध सोनं आहे. आता दोन्ही मिळून 158 किलो सोनं मंदिरसंस्थानकडं असेल अशी अपेक्षा आहे.


सोनं वितळवल्यावर काय करणार : मागील 10 वर्षात तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी वाहण्यात आली. यातीलच 200 किलो सोनं आणि सुमारे साडेचार हजार चांदीच्या दागिन्यांना आता वितळवलं जाणार आहे. हे सोनं-चांदी वितळवल्यानंतर त्याचे मोठे ब्लॉक करण्यात येणार असून वितळवण्यात आलेल्या सोन्याचे ब्लॉक राष्ट्रीयकृत बँकेत ठेवले जाणार आहेत. यातून मंदिराला भविष्यात उत्पन्न मिळणार आहे. हे सोनं वितळवल्यानंतर 50 ते 60 टक्के शुद्ध सोनं मिळेल असा अंदाज मंदिर प्रशासनाला आहे. तुळजाभवानी मंदिराचे पदाधिकारी सोनं चांदी वितळवण्याची पारदर्शक पद्धत अभ्यासण्यासाठी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देणार आहेत.

पुरातन दागिने गहाळ प्रकरणी चौकशी समिती : देवीच्या दान पेटीतील पुरातन दागिने गहाळ झाल्या प्रकरणी यापूर्वी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आला असून, याबाबत नुकतीच मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे यांनी बैठक घेऊन या अहवालावर चर्चा करून समितीनं काढलेल्या निष्कर्षानंतर दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वीच देवीचे पुरातन दागिने गायब झाल्या प्रकरणी एक महंत आणि धार्मिक व्यवस्थापक व काही मानकरी यांना याबाबत खुलासा करण्यास सांगण्यात आलं होतं. येत्या आठवड्यात या अहवालावर कायदेशीर मार्गदर्शन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाजी महाराज, ग्वाल्हेरच्या शिंदे अशा अनेक राजघराण्यांनी पुरातन नाणी आणि दागिने देवीला अर्पण केले होते. त्यातील काही नाणी आणि दागिने गायब आहेत. याबाबत गुन्हाही नोंद करण्यात आला असून या सर्व प्रकरणाबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत सल्ला घेतला जात असल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Neelam Gore Letter To Home Minister : तुळजाभवानी अलंकार चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, विधानपरिषद उपसभापतींचे पत्र
  2. Tuljabhavani Temple Donation: तुळजाभवानीला अर्पण केलेले सोने-चांदी, मौल्यवान वस्तूंची मोजदाद सुरू
  3. Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर संस्थानचा ड्रेस कोडवरून यु टर्न; भाविकांना कोणतेही निर्बंध नाहीत
Last Updated : Oct 7, 2023, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.