ETV Bharat / state

Neelam Gore Letter To Home Minister : तुळजाभवानी अलंकार चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, विधानपरिषद उपसभापतींचे गृहमंत्र्यांना पत्र

author img

By

Published : Jul 20, 2023, 8:35 PM IST

Updated : Jul 21, 2023, 12:48 PM IST

तुळजाभवानी देवीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब झाले आहेत. दागिन्यांच्या मोजणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचूपासून बनविलेले देवीचे 8 ते 10 मौल्यवान दागिने चोरी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपसभापती नीलम गोरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Neelam Gore Letter To Home Minister
Neelam Gore Letter To Home Minister

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरातून ऐतिहासिक वस्तू गायब झाल्या आहेत. तुळजाभवानी देवीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने चोरीला गेले आहेत. देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचूचे 8 ते 10 मौल्यवान अलंकार गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकरणाची दखल घेत निधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

निलम गोऱ्हेंचे गृहमंत्र्यांना पत्र
निलम गोऱ्हेंचे गृहमंत्र्यांना पत्र

काय लिहिले आहे पत्रात : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात उपसभापती नीलम गोऱ्हे लिहतात की, तुळजाभवानी मातेचे बहुसंख्य सोन्याचांदीचे दुर्मीळ पुरातनकालीन दागिने चोरी झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून माझ्या निदर्शनास आले आहे. यामध्ये, तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजे-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली मौल्यवान दुर्मीळ नाणी यांचाही समावेश आहे. ही बाब अत्यंत गंभीर, संतापजनक असून या प्रकरणी, अतिउच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष चौकशी पथक नेमण्याची मागणी गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण : तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी ७ जून रोजी प्रारंभ होऊन २३ जून रोजी प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु जवळपास ३ ते ४ दिवस मोजणी बंद असल्याने प्रत्यक्ष मोजणी १० ते १२ दिवस झाली. ही संपूर्ण मोजणी पूर्ण झाल्यानंतर अत्यंत धक्कादायक अशी बाब उजेडात आली आहे. देवीच्या दररोज वापरात असलेल्या १ ते ७ क्रमाकांच्या डब्यापैकी ६ क्रमांकाच्या डब्यातले ८ ते १० अलंकार गायब झाल्याचे समोर आले. तसेच काही ठिकाणी नवीन अलंकार ठेवण्यात आल्याचे समजले. यात देवीच्या खडावा, मोती, माणिक, पाचू या वस्तू आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व अलंकार पुरातन असल्याकारणाने या दागिन्यांचे मूल्यांकन करणे कठीण आहे. हे अलंकार कधी, कसे गायब झाले याचा आज अंदाज बांधणेही कठीण आहे. तसेच शिवकालीन अलंकाराच्या मोजणीचा अहवाल सादर करण्यासाठी २२ जुलै ही शेवटची तारीख होती. परंतु नेमणूक केलेल्या पंचकमीटीने हा अहवाल १८ जुलै रोजी सादर केल्यानंतर या गंभीर बाबी अहवालातून समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

हेही वाचा - Tuljabhavani Temple Donation: तुळजाभवानीला अर्पण केलेले सोने-चांदी, मौल्यवान वस्तूंची मोजदाद सुरू

Last Updated : Jul 21, 2023, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.