ETV Bharat / state

Nashik Onion Issue: कांद्याच्या भावात घसरण, लागवड खर्चही निघत नसल्याने बळीराजा हवालदिल

author img

By

Published : Mar 1, 2023, 1:29 PM IST

मालेगाव नांदगाव, चांदवड, मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून आज ही भाव मोठ्या प्रमाणात कोसळे आहे. आज कांद्याला प्रति किलो कमीत कमी 2 ते 3 रुपये, सरासरी 5 ते 6 रुपये भाव मिळाला. एक एकर कांदा पीक घेण्यासाठी सुमारे 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो मात्र, सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावात वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Onion price fall
कांद्याच्या भावात घसरण

बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण सुरूच

नाशिक ( मालेगाव ) : कधी अस्मानी कधी सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाचा फटका बसत आहे. हिरव्या भाजीपाल्यासाह कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. कांद्याला 2 ते 3 रुपये व सरासरी 5 ते 6 रुपये भाव मिळत आहे. यामुळे लागवड तर सोडा वाहतुक खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. किमान हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे.



विलासराव देशमुख यांची आठवण: स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कांद्याचे भाव घसरले होते. नाशिक जिल्ह्यातील आमदारानी त्यावेळी सभागृहात गदारोळ करत कामकाज बंद पाडले. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी 2 तासाची वेळ घेतली होती. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात विकलेल्या कांद्याला 200 रुपये अनुदान जाहीर केले, नुसते जाहीर नाही केले तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले. आज त्याची आठवण शेतकरी करत आहे. आम्हाला हमीभाव तर द्या, मात्र विकलेल्या कांद्याला अनुदान द्या यामुळे शेतकरी जगेल असे आवाहन करण्यात येत आहे. कांदा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकरी किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. मात्र सध्या सुरू असलेल्या भावामुळे उत्पादन शुल्क तर सोडा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला. जर असेच सुरू असले तर करावे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर जोरदार आवाज उठवला होता. सकाळी विरोधकांनी कांद्याचे दर घसरल्यामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांवर अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. विधान भवनात विरोधकांनी कांद्याच्या मुद्द्यावर प्रश्न उठवत राज्य सरकारला धारेवर धरले होते. आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचे प्रतिकिलो भाव 2 ते 4 रुपयांपर्यंत खाली आले. यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होत कांद्याचा लिलाव रोखला होता. कांद्याच्या निर्यातीवर कुठल्याही पद्धतीने बंदी नाही तसेच गरज पडल्यास शेतकऱ्यांना काही आर्थिक मदतही मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कांद्याच्या निर्यातीवर प्रश्न उपस्थित: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार छगन भुजबळ यांनी कांद्याचे दर घसरल्याने प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले की, राज्यातील सर्वात मोठी कांद्याची घाऊक बाजारपेठ माझ्या मतदारसंघात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कि, पाकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, मोरोक्को, उझबेकिस्तान आणि बेलारूस या देशांमध्ये भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे. यामुळे राज्यातून कांदा निर्यात केला गेला पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही छगन भुजबळ म्हणाले होते.

हेही वाचा: Eknath Shinde in Assembly विरोधकांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण म्हणाले आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.