ETV Bharat / state

सलीम कुत्ताशी संबंधावरून सुधाकर बडगुजर यांची दोन तास चौकशी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 9:21 PM IST

Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

Sudhakar Badgujar Questioned : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांची दोन तास चौकशी केली.

सुधाकर बडगुजर यांची पत्रकार परिषद

नाशिक Sudhakar Badgujar Questioned : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. सुधाकर बडगुजर यांचे राजकीय गॉडफादर कोण? तसंच बडगुजर कोणाच्या संपर्कात आहेत? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर बडगुजर यांची नाशिक पोलिसांनी दोन ताश चौकशी केल्याचं समोर आलं आहे. या चौकशीबाबतचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

सलीम कुत्ताशी कोणताही संबंध नाही : सलीम कुत्ताशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा बडगुजर यांनी केला आहे. स्पष्टीकरण देताना सुधाकर बडगुजर म्हणाले, "नितेश राणे यांनी योग्य माहिती घेतली नसावी. 2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी बैठक झाली होती. त्या सभेला आम्ही विरोध केला. त्यानंतर आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. 14-15 दिवस मी तुरुंगात होतो. त्याचवेळी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीही तुरुंगात होते. आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही फक्त नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैदी म्हणून एकत्र होतो.

राजकारणात येण्यापूर्वी माझ्यावर एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही गुन्हे दाखल झाले, ते राजकीय हेतूनं प्रेरित आहेत. सलीम कुत्ताला 92-93 मध्ये अटक झाली असावी. मला 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. माझे त्याच्याशी काहीच संबध नाही. यापुढं कधीही राहणार नाही - सुधाकर बडगुजर, नेते, शिवसेना ठाकरे गट

प्रफुल्ल पटेल, इक्बाल मिर्चीत करार : गुन्हेगार तुरुंगात असेल, तर तो बाहेर कसा आला? तो जामीनावर बाहेर आला असेल, तर सार्वजनिक ठिकाणी सहभागी होऊ शकतो. तर तिथंच आमची भेट झाली असण्याची शक्यता आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यानंतर बुद्धिबळाचा खेळ सुरू होतो. त्याबद्दल फार काही बोलण्यात अर्थ नाही. पोलिसांना तपासात सहकार्य करणार असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी स्पष्ट केलं. दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला अनेक आमदार, मंत्री उपस्थित होते. ती क्लिप सोशल मीडियावरही आहे. प्रफुल्ल पटेल, इक्बाल मिर्ची यांच्यात करार आहे. त्यांचं काय झालं? असा सवाल बडगुजर यांनी केला आहे.


हेही वाचा -

  1. ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो; सुधाकर बडगुजर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण
  2. ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची माहिती खोटी - सुषमा अंधारे
  3. कारागृह, न्यायालयातील सुविधांवर निधी खर्च करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.