ETV Bharat / state

१७ विधेयके संमत करीत हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 10:47 PM IST

Winter Session 2023
हिवाळी अधिवेशन

Winter Session 2023: नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे अखेर आज सूप वाजले. या अधिवेशन काळात विरोधी पक्ष पूर्णतः निष्प्रभ जाणवला. (Bills Passed) तर सत्ताधारी पक्षाने दहा दिवसांच्या काळात 17 विधेयके मंजूर केली. शासकीय कामकाज काढून घेण्यात सरकारला यश आलं असून या अधिवेशनात शेतकरी प्रश्नांवर आणि मराठा आरक्षणावर ठोस उपाययोजना न करता शासनाने अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडले. (Bills Discussed)

मुंबई Winter Session 2023: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे अखेर आज कामकाजाच्या दहाव्या दिवशी सूप वाजले. गेल्या दहा दिवसांमध्ये विधिमंडळात केवळ सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व जाणवले. आधीच क्षीण झालेल्या विरोधी पक्षाला विधिमंडळात फारसा प्रभाव दाखवता आला नाही. विधिमंडळाचे कामकाज कोणत्याही मुद्द्यावर विरोधी पक्ष बंद पाडू शकले नाही. सरकारला धारेवर धरताना विरोधी पक्ष एकसंघ जाणवला नाही. (Maharashtra Legislature) त्यामुळे सरकारने हे अधिवेशन दहा दिवसात गुंडाळले. इतकेच काय पण विदर्भासाठी महत्त्वाचे असलेल्या या अधिवेशनात विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्ताव विदर्भाच्या प्रश्नावर न आणता कायदा सुव्यवस्थेवर आणल्याने उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कान उपटले. या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना न करता आणि मराठा आरक्षणावर फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावण्याचे जाहीर करून सरकारने दोन्ही विषय गुंडाळले.


विधिमंडळातील कामकाज: तीन आठवड्यांच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रत्यक्ष दहा दिवसांचे कामकाज झाले. या कामकाजात एकूण 101 तास दहा मिनिटे कामकाज करण्यात आले. कोणत्याही कारणामुळे सभागृहाचा वेळ यावेळी वाया गेला नाही. रोजचे सरासरी कामकाज दहा तास पाच मिनिटे इतके झाले. सभागृहात प्राप्त प्रश्न 7581 इतके प्राप्त झाले. त्यापैकी 28 प्रश्न उत्तरीत करण्यात आले. सूचना प्राप्त झाल्या यापैकी दोन सूचना मान्य करण्यात आल्या आणि दोन्ही सूचनांवर चर्चा झाली. सभागृहात एकूण लक्षी सूचना 2414 प्राप्त झाल्या. त्यापैकी 337 सूचना स्वीकृत करण्यात आल्या तर 70 सूचनांवर चर्चा करण्यात आली.

अशी राहिली सूचनांची स्थिती: नियम 97 अन्वये 61 सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी एकाही सूचनेवर चर्चा करण्यात आली नाही. या अधिवेशनात 17 पूर्वस्थापित विधेयके मांडण्यात आली. ही सर्व विधेयके संमत करण्यात आली. नियम 293 अन्वये तीन सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी तिन्ही सूचना मान्य करण्यात आल्या. दोन सूचनांवर चर्चा करण्यात आली. अर्धा तास चर्चेच्या प्रश्नातून, उत्तरातून उद्‌भवलेल्या प्राप्त सूचना 25 होत्या. यापैकी 16 सूचना मांडणी करण्यात आल्या. एकाही सूचनेवर चर्चा झाली नाही. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर 115 सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 46 सूचना मान्य करण्यात आल्या. अशासकीय ठरावाच्या 2000 सूचना प्राप्त करण्यात आल्या. त्यापैकी 187 सूचना मान्य करण्यात आल्या. एकाही सूचनेवर चर्चा झाली नाही. अधिवेशनाच्या कामकाजा दरम्यान सभागृहात आमदारांची जास्तीत जास्त उपस्थिती 93 पूर्णांक 33 टक्के इतकी होती. तर कमीत कमी उपस्थिती ६४.७१ टक्के इतकी होती. एकूण सरासरी उपस्थिती ८१.६९ टक्के इतकी नोंदवण्यात आली. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली असून या कामकाजासोबत अधिवेशनाचे सूप वाजले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीला मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली.

हेही वाचा:

  1. एकगठ्ठा लोकप्रतिनिधी पक्षांतर बेकायदा करा, याचिकेवरून हायकोर्टाची भारत सरकारला नोटीस
  2. मुंबई हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीशांना लिंक पाठवून सायबर चोरट्याने घातला गंडा
  3. गावकरी ज्या दगडांची कुलदेवता म्हणून पूजा करायचे, ती निघाली डायनासोरची अंडी!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.