ETV Bharat / state

Tanha Pola 2023: २१७ वर्षांची परंपरा असलेल्या 'तान्हा' पोळ्याची लगबग सुरू; यंदा सणाचे आहे 'हे' वैशिष्ट्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 8:18 PM IST

Tanha Pola 2023 : विविध सांस्कृतिक परंपरेनं नटलेल्या विदर्भात 'तान्हा पोळा' या सणाला एक वेगळेच महत्त्व आहे. तान्हा पोळा या सणाला 217 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असल्याचं सांगितलं जातंय. नक्की हा सण काय आहे, तो कसा साजरा केला (what is tanha pola) जातो, याबाबत सविस्तर आपण या विशेष रिपोर्टमधून जाणून घेवू या.

tanha pola 2023
तान्हा पोळा 2023

बैल विक्रेत्यांची प्रतिक्रिया

नागपूर Tanha Pola 2023 : नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं पोळ्याचा सण साजरा केला जातोय. राज्याच्या इतर भागात ज्या प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो, अगदी त्याचप्रकारे तान्हा पोळ्याचा हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा गेल्या २१७ वर्षांपासून आजही सुरू आहे.

tanha pola 2023
तान्हा पोळा 2023

पोळ्याची लगबग सुरू : नागपुरसह पूर्व विदर्भात 'तान्हा' पोळ्याची लगबग ही सुरू झालीय. या दिवशी लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते. नागपूरच्या लकडगंज टीबरं मार्केटमध्ये एक हजार ते अडीच लाख रुपये किमतीचे नंदी बैल विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. पूर्व विदर्भात पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा तान्हा पोळा भारावला जातो. त्यासाठी विविध लाकडांच्या जातीपासून सुबक आणि आकर्षक नंदी बैल वर्षभर तयार केले जातात. ते लाकडी नंदी बैल हे आता लकडगंज येथील टीबरं मार्केटमध्ये विक्रीसाठी सज्ज (tanha pola know about festival) आहेत.

tanha pola 2023
तान्हा पोळा 2023
शेकडो कुटुंबाला मिळतो रोजगार : महत्वाचं म्हणजे लाकडी नंदी बैलांची विक्री करून, आज शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. यावर्षी नंदी बैल विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. तीनशे रुपये ते अडीच लाख रुपये किमतीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. लाकडी नंदी बैलांच्या किमती प्रचंड जास्त असल्यानं आता बाजारात त्या तुलनेत स्वस्त विविध धांतूंचे नंदी बैल विक्रीकरिता उपलब्ध झाले आहेत. धातूंच्या नंदी बैलांना देखभाल खर्चदेखील नसल्यानं ग्राहक आता याकडेदेखील वळू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० टक्क्यांनी मागणी वाढली असल्याचं दुकानदार सांगत (tanha pola 2023 in Nagpur) आहेत.
tanha pola 2023
तान्हा पोळा 2023



महाग असूनही लाकडी नंदीबैलांची विक्री जोरात : लाकडी नंदी बैलांची विक्री अगदी दणक्यात सुरू झाली आहे. पोळ्याच्या पाडव्याला साजरा होणाऱ्या तान्हा पोळ्यासाठी लाकडी नंदी बैलांचे बाजार आता सजायला सुरुवात (what is tanha pola) झालीय. सर्वात लहान नंदी बैलाची किंमत 300 रुपये आहे, तर सध्या सर्वात मोठा नंदी हा अडीच लाख रुपयात विक्रीसाठी तयार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी नंदी तयार केले जातात, त्याठिकाणी नंदी बैल विकत घेण्यासाठी हौशी नागपुरकर गर्दी करू लागले आहेत. नागपूर शहरात सुमारे शंभर कुटूंब वर्षभर नंदी तयार करतात.


हेही वाचा :

  1. Tanha Polla Festival in Nagpur नागपुरात तान्हा पोळ्याच्या उत्सवाची तयारी, अडीच लाख रुपयांचा लाकडी नंदी विक्रीसाठी उपलब्ध
  2. Bail pola 2022 कसा साजरा केला जातो बैल पोळा घ्या जाणून
  3. Tanha Pola 2022 नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळ्याची धूम, लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.