ETV Bharat / city

Tanha Pola 2022 नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळ्याची धूम, लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात

author img

By

Published : Aug 24, 2022, 5:02 PM IST

नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील जिल्यांमध्ये East Vidarbha and Nagpur अतिशय वेगळ्या पद्धतीने पोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा Tanha Pola 2022 साजरा करण्याची Celebrated Tanha Pola Utsav परंपरा आहे. लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते, ही परंपरा गेल्या ३०० वर्षांपासून आजही सुरू आहे. महत्वाचे म्हणजे यावर्षी देखील नंदी बैल विक्रीसाठी सज्ज झाले असून, ३०० रुपये ते अडीच लाख रुपये किमतीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध sale of wooden Nandi bulls झाले आहेत.

Tanha Pola 2022
लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात

नागपूर विविध सांस्कृतिक परंपरेने नटलेल्या विदर्भात पोळा या सणाला एक वेगळेच महत्त्व आहे. नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील जिल्यांमध्ये East Vidarbha and Nagpur अतिशय वेगळ्या पद्धतीने पोळ्याचा सण साजरा केला जातो. राज्याच्या इतर भागात ज्या प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो,अगदी त्याचं प्रकारे पोळ्याचा उत्सव साजरा केला जातो. मात्र,पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा Tanha Pola 2022 साजरा करण्याची Celebrated Tanha Pola Utsav परंपरा आहे. लाकडापासून तयार केलेले नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते, ही परंपरा गेल्या ३०० वर्षांपासून आजही सुरू आहे. महत्वाचे म्हणजे लाकडी नंदी बैलांची विक्री करून, आज शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. यावर्षी नंदी बैल विक्रीसाठी सज्ज झाले असून, ३०० रुपये ते अडीच लाख रुपये किमतीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध sale of wooden Nandi bulls झाले आहेत.




शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून बैलांकडे बघितले जाते. ऊन आणि पावसात शेतीत राबणाऱ्या बैलांच्या प्रति सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. संपूर्ण राज्यात पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, विदर्भात तान्हा पोळा सणाची विशेष धूम असते. तान्हा पोळा साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा खऱ्या अर्थाने नागपूरपासून सुरु झाली असली तरी, आता पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात तान्हा पोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एवढेच काय तर उर्वरित विदर्भाशिवाय राज्याच्या काही भागात देखील तान्हा पोळा साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा बैलांच्या प्रति प्रेम निर्माण व्हावे, या उद्देशाने तान्हा पोळा साजरा करण्यास सुरुवात झाली होती.

Tanha Pola 2022
लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात


लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात पोळ्याच्या पाडव्याला साजरा होणाऱ्या तान्हा पोळ्यासाठी लाकडी नंदी बैलांचे बाजार सजायला सुरुवात झाली आहे. सर्वात लहान नंदी बैलाची किंमत ३०० रुपये असून, सध्या सर्वात मोठा नंदी हा अडीच लाख रुपयात विक्रीसाठी तयार आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी नंदी तयार केले जातात त्याठिकाणी नंदी बैल विकत घेण्यासाठी हौशी नागपुरकर गर्दी करू लागले आहेत. नागपूर शहरात सुमारे शंभर कुटूंब वर्षभर नंदी तयार करतात, त्यातून सुमारे दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न या कुटुंबाला मिळते.



तान्हा पोळा उत्सवाची सुरुवात उपलब्ध माहितीनुसार १८०६ साली तान्हा पोळा उत्सव साजरा करण्याची परंपरा झाली. सुरुवातीला नागपूरातुन सुरू झालेला उत्सव, आता फार व्यापक झाला आहे. पोळ्याच्या सणाला बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. यामध्ये लहान मुलांचा सहभाग असावा या उद्देशाने, द्वितीय राजे रघुजी भोसले यांच्या संकल्पनेतुन तान्हा पोळा सण साजरा केला जाऊ लागला.

Tanha Pola 2022
लाकडी नंदी बैलांची विक्री जोरात



हेही वाचा Wednesday Motivation कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवल्यास हाती काहीच लागत नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.