ETV Bharat / state

नागपुरातील श्रीरामाचा असाही एक भक्त; १००१ लोकांच्या हातावर गोंदवतोय 'श्री रामा'चं नाव अन् तेही फ्री

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 9:28 PM IST

Shri Ram Name Tattoo : नागपुरातील एका २२ वर्षीय तरुणानं श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा उत्सव अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निश्चय केला आहे. (Inauguration Ram temple) रितिक राजेंद्र दरोडे असं या तरुणाचं नाव आहे. तो व्यावसायिक टॅटू कलाकार आहे. त्यानं अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे, (Ritik Darode) या आनंदात १००१ लोकांच्या हातावर नि:शुल्क श्रीराम गोंदवण्याचा संकल्प केला आहे. गेल्या आठ दिवसांत त्याने तब्बल ३५० लोकांच्या हातावर श्रीराम नावाचा टॅटू काढला देखील आहे.

Shriram Name Tattoo
रितीक दरोडे

श्रीराम नावाचा टॅटू काढण्यामागील संकल्पनेाच हेतू सांगताना रितीक दरोडे

नागपूर Shri Ram Name Tattoo : कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं प्रमुख केंद्र असलेल्या प्रभू श्रीरामाचं अयोध्येत मंदिर निर्माण कार्य पूर्णत्वास येत आहे. येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यामुळेचं संपूर्ण भारतात हा उत्सव अतिशय आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. इथे प्रत्येकाला जाणे शक्य नाही. त्यामुळे श्रीरामाचा हा उत्सव ज्याला जमेल तसा साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. (Ram tattoo record)

घरच्यांनी आणि मित्रांनी दिलं प्रोत्साहन: रितिक दरोडे तरुण दिवसाला ५० ते ६० लोकांच्या हातावर श्रीराम नावाचा टॅटू काढत असून येत्या २२ जानेवारीला त्याचा हा संकल्प पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास रितिकने व्यक्त केलाय. त्याच्या या कामात त्याचे वडील राजेंद्र, बहीण रोशनी आणि मित्र हातभार लावत आहेत. रितीकची प्रभू श्रीरामात प्रचंड श्रद्धा आहे. तो दरवर्षी रामजन्मोत्सवात काही-तरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम विराजमान होणार, ही आनंदवार्ता समजल्यापासून तो काहीतरी नाविन्यपूर्ण करण्यासाठी धडपडत होता. किमान १०१ लोकांच्या हातावर टॅटू काढण्याची संकल्पना वडिलांसमोर मांडली. त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्याने ही संकल्पना मित्रांकडे बोलून दाखवली. तेव्हा मित्रांना देखील ती संकल्पना आवडली. मात्र, त्यांनी १०१ पेक्षा १००१ लोकांच्या हातात टॅटू काढ आम्ही आर्थिक पाठबळ देऊ, असं मान्य केल्यानंतर रितीकने हा प्रवास सुरू केला आहे.

'हा' माझ्यासाठी अभिमानाचा क्षण: हजारो वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोट्यवधी हिंदूच्या स्वप्नातील श्रीराम मंदिर अयोध्येत उभं राहिलंय. येत्या २२ जानेवारीला रामलल्ला भव्य-दिव्य अशा मंदिरात विराजमान होणार आहे. हा क्षण हिंदूंसाठी ऐतिहासिक असणार आहे. यानिमित्तानं मला माझ्या कलेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यानं व्यक्त केली आहे.


प्रत्येकाला अयोध्येत जायचं आहे, मीसुद्धा जाणार: विविध धर्मांच्या संस्कृतीनं नटलेल्या भारतात रामाचा वनवास संपल्याचा आनंदोत्सव सर्व जाती धर्माचे लोकं साजरा करत आहेत. प्रभू रामामध्ये श्रध्दा असणाऱ्या प्रत्येकाला अयोध्येला जायचं आहे. पण ते आताचं शक्य नाही. म्हणून मी पुढच्या महिन्यात अयोध्येला जाईल आणि रामाचा आशीर्वाद घेईल असं तो म्हणाला आहे. संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं आहे. हजारो वर्षांची स्वप्नपूर्ती झाल्याची अद्‌भूत भावना राम मंदिर निर्मितीमुळे द्विगुणित झाली आहे. ज्यावेळी श्रीरामाचा प्रवेश अयोध्येत तयार झालेल्या नवीन राममंदिराच्या गर्भगृहात होणार आहे. तो क्षण प्रत्येकाला आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायचा आहे.


एक टॅटूमागे ३५० रुपयांचा खर्च: शरीरावर टॅटू गोंदवण्याचा खर्च फारचं असतो. त्यामुळे हौशी लोकचं टॅटू काढून घेत असे. मात्र, आता टॅटू हा स्टेटस सिम्बॉल आणि फॅशन झाला असल्यानं संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रितिकला एका टॅटूमागे साडेतीनशे रुपयांचा खर्च येतो आहे. त्या हिशोबाने 1001 लोकांच्या हातावर टॅटू काढण्यासाठी त्याला किमान साडेतीन लाख रुपये खर्च येणार आहे. त्याचा हा खर्च त्याचे वडील आणि मित्र परिवारांने शेअरिंग करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे त्याचा संकल्प पूर्णत्वास जाईल यात शंका नाही.

हेही वाचा:

  1. १० जानेवारीच्या निर्णयाकडं सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष, तर उद्धव ठाकरे गटाला निकालाकडून अपेक्षा धूसर
  2. सिंधुदुर्ग ठरतोय पर्यटनासाठी उत्तम पर्याय - सचिन तेंडुलकर
  3. दोन कोटी मराठा आंदोलकांमुळे हाहाकार माजेल; आंदोलन मुंबईत नको, उच्च न्यायालयात याचिका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.