सिंधुदुर्ग ठरतोय पर्यटनासाठी उत्तम पर्याय - सचिन तेंडुलकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 6:12 PM IST

thumbnail

सिंधुदुर्ग Sindhudurg Tourism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप येथे भेट दिल्यानंतर मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत भारतावर टीका केली होती. (Sachin Tendulkar) याचे पडसाद भारतात दिसू लागले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी पर्याय असू शकतो, असं 'एक्स' या सोशल माध्यमावर पोस्ट करत सांगितलं. (Maldives Controversy) तर या सोशल माध्यमावर 24 एप्रिल 2022 रोजी सचिन तेंडुलकरने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे बीचचा फोटो आणि भोगवे बीचवर आपण खेळत असतानाचा व्हिडिओ या सोशल माध्यमावर अपलोड केला आहे. (Bhogwe Beach) त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहिलं जाईल यात शंका नाही, असंही तो म्हणाला. 

अलिबाग बीचची बातच न्यारी : भारतातील इतर समुद्र किनाऱ्या सारखेच महाराष्ट्रातील समुद्र किनारेही सुंदर आहेत. याचचं एक उदाहरण म्हणजे अलिबाग बीच होय. अलिबाग बीच हा मुंबईपासून 30 किमी अंतरावर आहे. समुद्रकिनारा, स्वच्छ वाळू आणि उथळ पाण्यासाठी अलिबागची ओळख आहे. तसंच समुद्रकिनाऱ्या व्यतिरिक्त, या परिसरात कुलाबा किल्ला, अलिबाग बीच आणि उंढेरी किल्ला यासह इतर अनेक आकर्षणे आहेत. हे ठिकाण त्याच्या सीफूड आणि स्थानिक खाद्यपदार्थांसाठी देखील ओळखलं जातं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.