ETV Bharat / state

Corona: महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती नियंत्रणात, नागरिकांनी घाबरू नये; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

author img

By

Published : Dec 22, 2022, 10:00 PM IST

Updated : Dec 22, 2022, 10:54 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून नये असे अवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोरोना पुन्हा सक्रिय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार (दि. 22 डिसेंबर)रोजी तातडीची बैठक घेतली आहे. (Corona cases in Maharashtra) त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Corona situation under control) कोरोना संदर्भात खबरदारी घेण्यात येत असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नागपूर - कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठक घेऊन राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. (Chief Minister Eknath Shinde) यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

पंचसूत्रीचे काटेकोर पालन करा - सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाबाबतच्या सुचना द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. (Corona situation in Maharashtra) राज्यातील कोरोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूचा BF7. हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला आहे.

कोविडसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ कोरोना रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ( Coronavirus Today Maharashtra) चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोरोना अनुरूप वर्तन अशी पंचसुत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसुत्रीची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

विदेशातील सद्य:स्थिती काय? - ज्या चीनमधून पसरलेल्या करोना विषाणूने जगभर थैमान घातले त्या चीनमधील करोनाची सद्य:स्थिती हे सातत्याने एक गूढ राहिले आहे. सध्या चीनमधील करोना रुग्णांची दैनंदिन संख्या ही २४ तासांमध्ये सुमारे ३० हजारांवर जात आहे. (Corona Maharashtra Update Today) ताज्या माहितीनुसार चीनमधील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत गुरुवारी ३१,४४४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्वाधिक रुग्णसंख्येचा उच्चांक ताज्या आकड्यांनी मोडल्याचे चीनमधील ‘मॉर्निंग पोस्ट’ या वर्तमानपत्राने नमूद केले आहे. अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी येथेही दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जर्मनीतही सुमारे ३० हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली आहे, मात्र चीनकडून राबवण्यात आलेल्या कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ही रुग्णसंख्या धक्कादायक मानली जात आहे.

बीएफ.७ किती त्रासदायक? - करोना विषाणूचे डेल्टा हे उत्परिवर्तन सर्वाधिक त्रासदायक होते. त्यानंतर आलेला ओमायक्रॉन हा संक्रमण करण्याबाबत सर्वात वेगवान, मात्र लक्षणे आणि उपाय या निकषांवर सर्वात सौम्य असल्याचे दिसून आले. ओमायक्रॉनचा बीए.२.७५ हा एक उपप्रकार सोडल्यास बहुतांश उपप्रकार हे वेगवान प्रसारक तरीही सौम्य म्हणून नोंदवण्यात आले आहेत. अमेरिकेतील सुमारे पाच टक्के आणि ब्रिटनमधील सुमारे ७.२६ टक्के रुग्ण हे बीएफ.७ चे असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार आढळून आल्यानंतर त्याचे बारकाईने निरीक्षण संशोधन स्तरावर करण्यात आले, मात्र त्यामुळे त्या वेळी कोणतीही नाट्यमय रुग्णवाढ दिसून आलेली नाही. साहजिकच गंभीर लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होण्याची गरज असलेले रुग्णही त्यादरम्यान कमी होते, ही बाब दिलासादायक ठरली.

बीएफ.७ ची पार्श्वभूमी काय? - बीएफ.७ हा आत्ता अचानक उद्भवलेला ओमायक्रॉनचा उपप्रकार नाही. ऑक्टोबर २०२२ मध्ये बीएफ.७ सर्वात प्रथम जगाच्या नकाशावर आला. अमेरिका आणि काही युरोपियन देशांमध्ये या उपप्रकाराचे रुग्ण दिसून आले होते. त्याचदरम्यान चीनमध्ये बीएफ.७ आणि बीए.५.१.७ अशा दोन उपप्रकारांचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. ओमायक्रॉनचाच उपप्रकार असल्याने ११, १२ ऑक्टोबरला सुमारे १८०० नव्या रुग्णांची नोंद चीनमध्ये करण्यात आली होती, तसेच रुग्णसंख्या वाढीस नजीकच्या भविष्यात हा प्रकार कारणीभूत ठरेल, असे अनुमानही जागतिक स्तरावर वर्तवण्यात आले होते.

संक्रमित होणारा विषाणू प्रकार कोणता? - गेल्या सुमारे वर्षभरात जगाच्या कानाकोपऱ्यात करोना लाटा निर्माण करणारा विषाणू हा प्रामुख्याने ओमायक्रॉनचाच उपप्रकार असल्याचे दिसून येत आहे. डेल्टा या करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारानंतर सर्वाधिक वेगवान संक्रमण करणारा प्रकार म्हणून ओमायक्रॉन हा प्रकार पुढे आला. डेल्टाक्रॉनसारखे इतरही काही प्रकार आले, मात्र ते तुलनेने क्षीण आणि तात्पुरते ठरले. ओमायक्रॉन आणि त्याचे उपप्रकार मात्र तग धरून ठेवण्यात यशस्वी झाले. चीनमध्ये सध्या दिसणाऱ्या रुग्णवाढीस कारणीभूत ठरणारा प्रकारही ओमायक्रॉनचा उपप्रकार असून ‘बीएफ.७’ असे त्याचे जनुकीय नामकरण करण्यात आले आहे.

Last Updated :Dec 22, 2022, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.