BJP Women Leader Murder Case : तो मृतदेह 'त्या' महिला नेत्याचा नाहीच! डीएनए चाचणीत धक्कादायक खुलासा

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Sep 9, 2023, 2:16 PM IST

Murder

BJP Women Leader Murder Case : नागपूर भाजपा महिला नेत्याच्या हत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर आलीय. काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळालेला मृतदेह या महिलेचा नव्हता, असं मृतदेहाच्या डीएनए चाचणीत उघड झालं आहे. सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

नागपूर BJP Women Leader Murder Case : नागपूरमधील भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या हत्येला बराच कालावधी लोटला आहे. मात्र या महिला नेत्याचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. मध्यंतरी मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तो मृतदेह या भाजपा नेत्याचा असावा, असा संशय नागपूर पोलिसांना होता. त्यासाठी पोलिसांनी या मृतदेहाची डीएनए चाचणी केली. आता डीएनए चाचणीचा रिपोर्ट समोर आला असून, तो मृतदेह त्या महिला नेत्याचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

हत्या झाल्याचा पुरावा मिळाला होता : मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये या महिला नेत्याची हत्या झाल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला होता. ज्या घरात त्यांची हत्या झाली, त्या ठिकाणी सोफ्याच्या फोममध्ये पोलिसांना रक्ताचे डाग सापडले होते. हे रक्त त्या महिला नेत्याचंंच असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं. हत्येच्या दिवशी आरोपीनं या महिलेचा मृतदेह घराच्या कार्पेटखाली लपवून ठेवला होता. एका प्रत्यक्षदर्शीनं तो मृतदेह पाहिला असल्याची साक्ष पोलिसांना दिली आहे. या शिवाय आरोपीच्या नोकरानंही आरोपीच्या कारच्या डिक्कीत रक्त पाहिल्याची साक्ष पोलिसांना दिली आहे. अशाप्रकारे पोलिसांकडं आरोपी विरोधात भक्कम पुरावे आहेत.

माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर : या हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. आरोपीनं हत्येची कबूली दिली असली तरी अद्याप मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. जोपर्यंत मृतदेह मिळत नाही तोपर्यंत केस मजबूत होणार नाही. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.


मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी गुगलची मदत : या खून प्रकरणी नागपूर पोलिसांना अद्याप पाहिजे तसं यश मिळालं नसल्यानं पोलिसांनी तांत्रिक दृष्टीनं तपास सुरू केला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी महिलेच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी गुगलची मदत मागितली आहे. याद्वारे अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. BJP Woman Leader Murder case: भाजपा महिला नेत्या हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांनी गोळा केले भक्कम 'पुरावे'
  2. BJP Woman Leader Murder case : भाजपा महिला हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांची 'ती' मागणी न्यायालयाने फेटाळली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.