BJP Woman Leader Murder case: भाजपा महिला नेत्या हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांनी गोळा केले भक्कम 'पुरावे'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 9:12 AM IST

Updated : Sep 6, 2023, 11:48 AM IST

BJP Woman Leader Murder case

BJP Woman Leader Murder case: गेल्या महिनाभरापासून भाजपा महिला नेत्या बेपत्ता आहेत. या दरम्यान महिलेची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली. यासंदर्भातील महत्त्वाचे पुरावे आता नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहेत. नागपूर शहर पोलिसांना भाजपा महिला हत्या प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार सापडला आहे.

नागपूर : BJP Woman Leader Murder case: गेल्या महिन्याभरापासून नागपूर पोलिसांचं एक पथक मध्यप्रदेशच्या जबलपूर इथं भाजपा महिला हत्या प्रकरणात साक्ष पुरावे गोळ्या करण्याचं काम करत आहे. या पथकानं आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले आहेत. भाजपा महिलेचा मृतदेह जरी अद्याप सापडलेला नसला तरी, हत्या प्रकरणाशी संबंधित भक्कम पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. जबलपूरमध्ये राहत्या घरी आरोपीनं महिलेची हत्या (Murder case) केली होती. (Nagpur Crime News) त्या ठिकाणी सोफ्याच्या फोममध्ये रक्ताचे नमुने पोलिसांना मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे : (BJP Woman Murder case) : हत्येच्या दिवशी आरोपीनं त्याच्या घरी महिलेचा मृतदेह कार्पेट खाली लपवून ठेवलेला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली. या प्रत्यक्षदर्शीनं कार्पेटच्या खालून मृतदेहाचे पाय पाहिल्याची साक्ष पोलिसांना दिली. शिवाय आरोपीच्या हॉटेलमधील नोकर जितेंद्र गौडनं आधीच आरोपीच्या कारच्या डिक्कीत रक्त पाहिल्याची साक्ष पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आरोपीनेच भाजपा महिलेची हत्या केली आहे. यासंदर्भात महत्त्वाचे पुरावे आता पोलिसांच्या हाती आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.नार्को चाचणीचा अर्ज फेटाळला : भाजपा नेत्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीची नार्को चाचणी करण्याची याचिका प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयानं फेटाळली आहे. आरोपीनं महिलेची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, गेल्या एक महिन्यापासून महिलेचा मृतदेह पोलिसांना मिळून आला नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीची नार्को चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडं मागितली होती.माहिती देणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस : भाजपा महिला नेत्या हत्या प्रकरणात (Nagpur Crime News) नागपूर शहर पोलिसांचे सर्वच प्रयत्न आता अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पोलिसांनी महिला नेत्या हत्या प्रकरणात माहिती देणाऱ्यासाठी १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. गेल्या महिनाभरापासून भाजपा महिला नेत्या बेपत्ता आहेत. या दरम्यान महिलेची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली असली तरी, अद्याप महिलेचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नागपूर पोलिसांनी ( Nagpur Police ) महिला हत्या प्रकरणात साक्ष-पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जो पर्यंत मृतदेह मिळून येत नाही तो पर्यंत केस मजबूत होणार नाही हे माहीत असल्यानं, या प्रकारणाची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं आहे. ही घोषणा मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी केली आहे.महिलेच्या मोबाईलमध्ये दडले आहेत राज : भाजपा महिला हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांना अद्यापही पाहिजे तसे यश मिळालेले नसल्यानं, आता नागपूर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीनं तपास सुरू केलेला आहे. महिलेची हत्या होऊन आता जवळजवळ एक माहिना लोटलेला आहे. भाजपा महिलेचा मृतदेह आणि मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. महिलेच्या मोबाईलमध्ये खूप काही दडलं असावं, म्हणून आरोपींनी महिलेचा मोबाईल नष्ट केल्याचा दाट संशय नागपूर पोलिसांना आहे.


हेही वाचा -

  1. BJP Woman Leader Murder case : भाजपा महिला हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांची 'ती' मागणी न्यायालयाने फेटाळली
  2. BJP Woman Leader Murder case : भाजपा महिला हत्या प्रकरण; नागपूर पोलिसांची 'ती' मागणी न्यायालयाने फेटाळली
  3. Nagpur Murder case : महिला हत्या प्रकरणात आरोपी करत आहे दिशाभूल; पोलिसांनी मागितली नार्को चाचणीची परवानगी
Last Updated :Sep 6, 2023, 11:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.