ETV Bharat / state

Shambhuraj Desai Vs Vinayak Raut : वक्तव्य मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करू; शंभूराज देसाईंचा विनायक राऊतांना इशारा

author img

By

Published : May 30, 2023, 2:30 PM IST

Updated : May 30, 2023, 2:59 PM IST

शिंदे गटाचे 22 आमदार नाराज असून शिंदे गट सोडण्याच्या मन:स्थितीत असल्याचे खळबजनक विधान खासदार विनायक राऊत यांनी केले. त्यावर गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी ही बाब तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी विनायक राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे.

Shambhuraj Desai
शंभूराज देसाई

मुंबई: विनायक राऊत यांना भविष्य समजते का? त्यांना चेहऱ्यावरून भविष्य कळते का? खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले 9 खासदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • #WATCH | "Can Vinayak Raut see the future? Does he know face-reading? He says anything. There is no fact to what he says. We are all satisfied. Under the leadership of CM Eknath Shinde, we are working well. Vinayak Raut keeps saying things like this, we don't pay attention to… pic.twitter.com/vMTbpc1kxI

    — ANI (@ANI) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सातत्याने ठाकरे गटाला अनेक धक्के : शिंदे गटाचे नेते व गृहमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, की विनायक राऊत यांनीही माझ्याबाबत असेच विधान केले आहे. मी त्यांना दोन दिवसांचा वेळ दिला. मी माझ्या कायदेशीर सल्लागाराशी बोललो असून त्यानुसार कारवाई करणार आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध केलेले वक्तव्य मागे घ्यावे. अन्यथा त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी स्वत:ला तयार ठेवावे, असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगले काम करत आहोत. विनायक राऊत अशा गोष्टी बोलत राहतात, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. राज्यातील सत्तास्थापनेनंतर शिंदे गटाने सातत्याने ठाकरे गटाला अनेक धक्के दिले आहेत. ठाकरे गट अद्याप या धक्क्यातून सावरलेला नाही.

काय म्हणाले होते राऊत : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटाच्या आमदार, खासदारांबाबत खळबळजनक दावा केला होता. शिंदे गटाचे 22 आमदार, 9 खासदार संपर्कात असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांनी आपली बाजू मांडताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार गजानन कीर्तिकर यांची नावे घेतली होती. आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे विनायक राऊतंचं वक्तव्य पूर्णपणे खोटं असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांना दोन दिवसांत वक्त्यव्य मागे घ्या अन्यथा कारवाईला तयार रहा असा इशारा देसाई यांनी दिला आहे. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते.

"गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर सुरतला गेल्यापासून मी उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांशी अर्धा सेकंदही बोललो नाही. विनायक राऊत यांनी केलेले विधान खोटे शंभर टक्के खोटे असुन यात काही तथ्य नाही'- शंभूराज देसाई

भाजपमुळे शिंदेंची शिवसेना नाराज : महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे विधान आम्ही केले होते. ते खोडून काढण्यासाठी राऊत बोलले असावेत. पण, त्यांनी माझ्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar on Seat Allocation: कुठल्याही पक्षाकडे मोदींविरोधात लढण्यासाठी ताकद नसल्याने...अजित पवारांचे जागा वाटपाबाबत स्पष्ट वक्तव्य

Last Updated : May 30, 2023, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.