ETV Bharat / state

Sarfaraz Memon Arrested : धमकीच्या मेल पत्नीने केल्याचा दावा, संशयास्पद हलचाली प्रकरणी पोलिसांकडून सरफराज मेमनला अटक

author img

By

Published : Mar 1, 2023, 7:37 AM IST

रविवारी राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा असलेल्या एनआयएला एका निनावी मेल आयडीद्वारे मेल आला. या मेलमध्ये सरफराज मेमनचा उल्लेख करत त्याचे आधार कार्ड, वाहनाचा परवाना, पासपोर्ट, लिविंग सर्टिफिकेट असा सर्व तपशील जोडण्यात आला होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

Mumbai News
सरफराज मेमन

मुंबई : डेंजर मॅन या नावाने पाठवलेल्या मेलमध्ये एनआयएने काही तपशील तपास यंत्रणांना दिला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांसह अन्य तपास यंत्रणांची झोपच उडाली होती. महाराष्ट्र एटीएस आणि मध्यप्रदेश पोलीस एकत्रितपणे सरफराज याची चौकशी करत आहे. त्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासा आला आहे. तो 41 वर्षांचा असून त्याच्या पासपोर्टवर 2018 - 2019 दरम्यान तो चीनला गेला असल्याचा शिक्का देखील आहे. त्याच्या पासपोर्टचा अधिक तपशील तपास यंत्रणांकडून जमा केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.

आकसापोटी मेल केल्याची शक्यता : चीनमधील महिलेशी सर्फराजने लग्न केले होते. त्यानंतर तिच्याशी घटस्फोट घेत असल्याच्या आकसापोटी तिने हा मेल केला असावा अशी शक्यता सर्फराजने तपास यंत्रणांकडे वर्तवली आहे. सरफराज मेमन मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसकडून मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली होती. यातून तपासाची चक्रे वेगाने फिरली. सरफराज मेमन हा आयएसआयचा सदस्य असल्याची चर्चा आहे. सरफराजने मी दहशतवादी नसल्याचे पोलिसांना सांगितलेले आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत सरफराज मेमनने सांगितले की, तो कामानिमित्त चीन आणि हॉंगकॉंग येथे गेले काही वर्ष राहण्यास होता. सर्फराजची अगोदरच दोन लग्न झालेली असताना त्याने चीनमधील महिलेची तिसरे लग्न केले होते.

सरफराज मेमनची चार लग्न : दोघांचे खटके उडू लागल्याने सरफराजने घटस्फोट घेण्याचे ठरवले. मात्र चीनमधील महिलेचा घटस्फोट देण्यास विरोध होता. त्यानंतर सरफराज चीनमधून मध्य प्रदेशातील इंदोर येथे आला. इंदूरमध्ये आल्यानंतर त्याने चौथे लग्न केले. सरफराज मेमनच्या पत्नीचा विरोध असताना देखील तो घटस्फोट देत असल्याचा राग मनात धरून तिने हा मेल बदनाम करण्यासाठी केला असावा असा धक्कादायक खुलासा सरफराज यांने चौकशीत केला आहे. तो इंग्रजी आणि चिनी भाषा बोलत असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.


मुंबई ते चीनपर्यंत धागेदोरे : अशा प्रकारे या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई ते मध्य प्रदेश आणि आता मध्य प्रदेश ते चीन इथपर्यंत जाऊन पोहचले आहेत. त्यामुळे नक्की खरे काय आणि खोटे काय याबाबत तपास यंत्रणांच्या अंतिम चौकशीनंतर स्पष्ट होईल असे, पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. मुंबई क्राइम ब्रँचचे क्राईम इंटेलिजन्स युनिट (सीआययू) या प्रकरणाची पाहणी करत असताना सरफराज मेमनचा शोध घेण्यासाठी सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले होते. महाराष्ट्र एटीएस आणि इतर शहर जिल्हा पोलिसांना देखील सर्फराजबद्दल माहिती देण्यात आली होती. जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत सर्व शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले होते. अखेर सरफराज मेमनला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसच्या विशेष पथकाला यश आले आहे.


मुंबईत घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्न : गेली 12 वर्ष चीन पाकिस्तान आणि हॉंगकॉंगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेल्या इंदूर येथील सरफराज मेमन हा सध्या मुंबईत तो घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा मेसेज एनआयएने ईमेल द्वारे पाठवला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांसह अन्य तपास यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. त्यानुसार एटीएसच्या विशेष पथकाने इंदूरच्या धार रोड परिसरात राहणारा सर्फराज मेमन याला शोधून काढले आहे.

हेही वाचा : Bombay High Court: पोलीस लहरीपणाने स्वतःच्या हितासाठी कायद्याचा वापर करू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांच्या तपासावर ताशेरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.