ETV Bharat / state

Bombay High Court: पोलीस लहरीपणाने स्वतःच्या हितासाठी कायद्याचा वापर करू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांच्या तपासावर ताशेरे

author img

By

Published : Mar 1, 2023, 6:44 AM IST

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यामुर्ती रेवती डेरे आणि पि.के. चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांना, अंजली दमानिया विरुद्ध महाराष्ट्र राज्य याचिका सुनावणी दरम्यान सांगितले की, पोलिसांनी वैयक्तिक हित साधण्यासाठी यंत्रणा आणि कायदेशीर यंत्रणा वापरू नये.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पि.के. चव्हाण यांच्या खंडपीठांसमोर अंजली दमानिया विरुद्ध महाराष्ट्र राज्य अशी याचीका सुनावणीसाठी आली होती. त्या संदर्भात दमानिया यांच्या विरोधात ज्या पद्धतीने प्राथमिक आरोपपत्र दाखल केले गेले. शेवटी कोणताही गुन्हा झाल्या नसल्याचे सांगून पुरवणी आरोपपत्र दाखल केले. पोलिसांच्या अशा पद्धतीने लहरीपणाच्या वागणुकीवर मुंबई उच्च न्यायालयाने कठोर शब्दात फटकारले आहे.


वैयक्तिक हित साधण्यासाठी न्यायालयाची यंत्रणा नाही : न्यायमूर्तींनी मुंबई पोलिसांना स्पष्टपणे बजावले की, तुम्ही लहरीपणाने वैयक्तिक हित साधण्यासाठी न्यायालयाची यंत्रणा वापरू शकत नाही. कोणताही तपास करताना कायद्याचे पालन केले पाहिजे. पोलिसांना पुढे असे देखील सांगितले की, प्रथम तुम्ही एखाद्या आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल करता, आणि मग तुम्ही म्हणता की त्याचा गुन्हा नाही. पोलिसांच्या अशा लहरीपणामुळे कायद्याचा भंग होतो. त्यामुळे पोलिसांनी लहरीपणाने वागू नये. स्वतःच्या हिताला कायद्याच्या आड आणू नये; असे देखील न्यायमूर्ती चव्हाण यांनी या याचिकेदरम्यान पोलिसांच्या वकिलांना स्पष्टपणे बजावले.


पोलिसांना तंबी : अंजली दमानिया यांच्याविरुद्ध जानेवारी 2021 मध्ये एक गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याची मागणी या याचिकेमध्ये होती. ही याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पि.के. चव्हाण यांच्या खंडपीठांसमोर सुनावणीसाठी आली होते. अंजली दमानिया यांच्यावर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये हे स्पष्ट झाले की, या प्रकरणात त्यांनी कोणतीही भूमिका बजावली नाही. ही बाब फिर्यादी व्यक्तीला देखील आढळून आली. त्यामुळे न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूची बाजू स्पष्टपणे ऐकून घेत पोलिसांना तंबी दिली. न्यायमूर्तींनी पुढे असे देखील नमूद केले की, तुम्ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. मग तो तुम्ही तार्किक निष्कर्षापर्यंत पुढे सुसंगत रीतीने नेला पाहिजे. फौजदारी प्रक्रिया साहित्याच्या कलम 321 अंतर्गत तुम्ही दाखल करा, तो तार्किक शेवटापर्यंत न्यावा, असे देखील कोर्टाने आपल्या निर्देशामध्ये म्हटले आहे.

चौकशीसाठी बोलून न घेता आरोपपत्र दाखल : अंजली दमानिया यांची बाजू अधिवक्ता अर्जित जयकर यांनी मांडली आणि त्यांनी खंडपीठांसमोर सांगितले की, अंजली दमानिया यांनी तात्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहिल्यानंतर या संदर्भातला तपास हाती घेण्यात आला. त्या पत्रामध्ये अंजली दमानिया यांनी नमूद केली होती की, त्यांना चौकशीसाठी बोलून न घेता त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. ही बाब त्यांनी पोलीस आयुक्त यांच्या नजरेस आणून दिली होती. खंडपीठाने या याचिकेच्या संदर्भात निर्णय प्रलंबित ठेवला आहे. पुढील सुनावणी दोन मार्च रोजी निश्चित केली आहे.


हेही वाचा : Ramoji Film City : महिला दिनानिमित्त 'रामोजी फिल्म सिटी'त खास ऑफर; घरबसल्या आजच करा बुकिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.