ETV Bharat / state

Raj Kundra Pornography Case : पॉर्नोग्राफी प्रकरणी चार्जशीटवर राज कुंद्राच्या वकिलाची प्रतिक्रिया, म्हणाले...

author img

By

Published : Nov 22, 2022, 9:43 AM IST

Updated : Nov 22, 2022, 10:09 AM IST

Raj Kundra Pornography Case
राज कुंद्राच्या वकिलाची प्रतिक्रिया

राज कुंद्रा अश्लील व्हिडिओ निर्मिती प्रकरणी मुंबई सायबर क्राईमने न्यायालयात आरोपपत्र (Mumbai Cyber Crimes chargesheet) दाखल केले (Raj Kundras Advocate reaction On Pornography Case) आहे. कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करण्यासाठी आणि आरोपपत्राची प्रत गोळा करण्यासाठी आम्ही न्यायालयात हजर राहू, असे कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई : राज कुंद्रा अश्लील व्हिडिओ निर्मिती प्रकरणी मुंबई सायबर क्राईमने न्यायालयात आरोपपत्र (Mumbai Cyber Crimes chargesheet) दाखल केले (Raj Kundras Advocate reaction On Pornography Case) आहे. कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करण्यासाठी आणि आरोपपत्राची प्रत गोळा करण्यासाठी आम्ही न्यायालयात हजर राहू, असे कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे. एफआयआर आणि मीडिया रिपोर्ट्सवरून आम्हाला जे काही आरोप समजले आहेत. माझ्या क्लायंटचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झालेला नाही, असेही ते म्हणाले.

अश्लील व्हिडिओ निर्मिती : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ निर्मिती प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, मुंबईतील उपनगरातील दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओ शूटकरून यामधून आर्थिक मोबदल्यासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ प्रसारित केले होते. असे मुंबई सायबर सेलने आरोप पत्रात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी 450 पानाचे आरोप पत्र मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले (Raj Kundras Advocate reaction) आहे.

हॉटेल्समध्ये अश्लील व्हिडिओ शूट : या आरोप पत्रामध्ये मुंबई पोलिसांनी असे म्हटले आहे की, उद्योगपती राज कुंद्रा, मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे आणि चित्रपट निर्माती मीता झुनझुनवाला आणि कॅमेरामन यांनी एकमेकांशी संगनमत करून उपनगरातील दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये अश्लील पोर्न व्हिडिओ शूट केले होते. हे व्हिडिओ आर्थिक मोबदल्यासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर संगणमताने प्रसारित केले होते, असे आरोपपत्रात म्हटले (Raj Kundra Pornography Case) आहे.

काय आहे नेमके प्रकरण : राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडनस्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीच्या सर्व कन्टेन्टची निर्मिती या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली होती.

Last Updated :Nov 22, 2022, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.