ETV Bharat / state

Teacher Honor Award: राज्यातील 108 शिक्षकांच्या रखडलेल्या पुरस्कारांना मिळाला मुहूर्त; उद्या पार पडणार शिक्षकांचा सपत्नीक सत्कार सोहळा

author img

By

Published : Feb 23, 2023, 1:06 PM IST

दरवर्षी डिसेंबर जानेवारी या महिन्यांमध्ये होणारे शिक्षक सन्मान पुरस्कार यंदा शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे लांबले. आचारसंहिता लागल्यामुळे शासनाने पुरस्कार सोहळा पुढे ढकलला होता. अखेर त्याला मुहूर्त मिळालेला आहे. उद्या 24 फेब्रुवारी रोजी मुंबईत राज्यातील 108 शिक्षकांना पुरस्कार दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

Teacher Award
शिक्षकांचे रखडलेले पुरस्कार

मुंबई : शिक्षकाकडे समाजातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिले जाते. चांगल्या शिक्षकांना त्यांच्या कामांना, त्यांच्या गुणांना वाव देऊन, त्यांच्या श्रमांना कौतुक करून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आपल्याकडे आधीपासूनच आहे. राज्यामध्ये सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराबाबत 29 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय झाला. मात्र पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे राज्यातील शिक्षकांचे पुरस्कार लांबले होते. निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाली तरीही पुरस्कार घोषित झालेले नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरलेली होती. मात्र सरकारने सोहळा कार्यक्रम आयोजन केले आहे. मुंबईत रंगशारदा सभागृहात पुरस्कार सोहळा होणार आहे.


शिक्षक पुरस्काराचे वाटप : महाराष्ट्रामध्ये एकूण शासकीय आणि खाजगी अनुदानित या शाळांमध्ये शिक्षकांची कामगिरी, त्यांचे गुण, त्यांचे नेतृत्व पाहून सन्मान करण्यासंदर्भात शासनाने निर्णय केलेला होता. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराचे वाटप हे वेळेत केले गेले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरलेली आहे. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे शिक्षकांचे सन्मान पुरस्कार रखडले होते. या वेळेला शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे शासनाने हे सन्मान पुरस्कार पुढे ढकलले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने हे पुरस्कार दिले जाणार होते. मात्र त्याचवेळी राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा शासनाने स्थगित केला. मात्र निवडणूक होऊन आता आठ दिवस देखील झाले, तरीही पुरस्कारांचा सन्मान सोहळा अद्यापही लांबलेलाच आहे. त्याच्या कोणत्याही तारखा निश्चित होत नाही.

सपत्नीक सत्कार सोहळा : महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात 2022 च्या वर्ष आखरीस 29 डिसेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये राज्यातील विविध शैक्षणिक शिक्षण संस्था सरकारी शाळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे, विविध प्रकारचे शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या अशा 108 शिक्षकांना वर्ष 21 आणि 22 साठीचे पुरस्कार जाहीर केले गेले होते. या पुरस्कारामध्ये क्रीडा, कला, विज्ञान असे विषय तसेच प्राथमिक माध्यमिक तसेच आदिवासी क्षेत्रामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळेतील शिक्षकांचा समावेश होता. प्राथमिक विभागात 38, माध्यमिक विभागात 39, आणि आदिवासी विभागात 18 आदर्श शिक्षिका, आठ विशेष शिक्षक, कलाक्षेत्र दोन, दिव्यांग शाळा शिक्षक, एक स्काऊट गाईडमधील शिक्षक अशा एकूण 108 शिक्षकांचा सपत्नीक सत्कार सोहळा उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.



पुरस्कारासाचा मुहूर्त : यासंदर्भात शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी नमूद केले की, या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली गेली. त्यामुळे शासनाने सावित्रीबाई सन्मान पुरस्कार पुढे ढकलले. मात्र आता ही संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. शासनाने या गोष्टी वेळेत करायला हव्या. अन्यथा उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांच्या सर्व कामावर पाणी फिरल्यासारखे होतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाजामध्ये क्रांतीची मुहूर्तमेढ रुजवली. शिक्षणामध्ये पहिल्यांदा तळागाळातील समाजाला स्थान देण्यासाठी ते झटले. त्यांनी देशाला दिशा दाखवली. त्यांच्या नावाने दिला जाणारा सन्मान पुरस्कार शासनाने उशिरा का होईना, मात्र यासाठी मुहूर्त मिळाला ही चांगली बाब आहे.

हेही वाचा : Kasba By Election: कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला, भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.