ETV Bharat / state

Kasba By Election: कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला, भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू

author img

By

Published : Feb 23, 2023, 8:56 AM IST

Updated : Feb 23, 2023, 9:06 AM IST

कसबा पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले आहे. तर केशव उपाध्याय यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला आहे. आजारी असतानाही गिरीश बापट हे प्रचारात उतरल्याने काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे.

Kasba By Election
शरद पवारांचे खेळाडूंना आवाहन

प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे व केशव उपाध्ये

पुणे : बालेवाडी येथील जागेवर स्टेडियम उभारणीची मुहुर्तमेढ १९९४ साली रोवली. त्या ठिकाणाहून येता जाता अस्वस्थ होते. ऐवढे मोठे स्टेडियम असूनही सर्वसामान्य घरातील खेळाडूला सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. अर्थकारण मोठे झाले असून ही परिस्थिती बदलणे गरजेची असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेळाडूंशी चर्चा करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहनही त्यांनी केले. अनेक खेळाडू मोठे होताना पाहिले असून खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ खेळाडूंच्या मेळावा आणि सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार रविंद्र धंगेकर, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, अ‍ॅड. अभय छाजेड, रोहित टिळक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपक मानकर, काका पवार, यांसह शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चोख बंदोबस्त : कसबा पेठ विधानसभा मतदार संघात प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक व नाका तपासणी पथकामार्फत आतापर्यंत १० हजार ६६८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. प्रशासनामार्फत मतदार संघात ९ तपासणी नाके तसेच ९ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच भरारी पथकामार्फत संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. पोलिस विभागामार्फत कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य मिळत आहे. १२ हजार २५० रूपये किमतीचे २३१ लिटर मद्य हस्तगत करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे. उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीचे निरीक्षण निवडणूक खर्च निरीक्षक मंझरुल हसन यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार : कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. अश्यातच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जर आम्हाला माहीत असते की, भाजप खासदार गिरीश बापट यांचे अश्या परिस्थितीत प्रचारात वापर करणार असेल तर आम्ही आमचा उमेदवार दिला नसता, असे यावेळी लोंढे यांनी सांगितले आहे.

प्रचारार्थ रॅलीचे आयोजन : कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, काँगेस प्रवक्ते अतुल लोंढे हे देखील उपस्थित होते. यावेळी या रॅलीला सुरुवात बागवे कमान, महात्मा फुले वाडा, माँसे अळी, चांदतारा चौक-जोहरा कॉम्प्लेक्सअशी झाली. भाजप प्रचारात गुंडांना आणत आहे. यावर अतुल लोंढे म्हणाले की, मोक्काच्या गुंडांबरोबर पोलिसांच्या बैठका कश्या होतात.

उमेदवार विजयी होणार : भाजपमध्ये गेल्यावर लोकांना निवांत झोप येत आहे, असे त्यांचेच नेते सांगत आहे. त्यांच्या नेत्यांना ईडी, सीबीआय याची भीतीच वाटत नाही. हे त्यांनी सांगितले आहे. आता संजय काकडे जर म्हणत असतील की, आम्ही गुंडांचा वापर करत नाही. असे जर ते स्पष्टीकरण देत असतील तर चांगले आहे. असे देखील यावेळी लोंढे म्हणाले. यावेळी विद्याताई म्हणाल्या की, चिंचवड आणि कसबा मतदार संघातील दोन्ही निवडणुकीत आमचे उमेदवार हे विजयी होणार आहे. त्यांनी कसलाही वापर केला तरी दोन्ही मतदार संघातील जनता आमच्या उमेदवाराला विजयी करतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे विसर्जन : पुण्यातील कसबा विधानसभेचे निवडणूक म्हणजे महाविकास आघाडीचे विसर्जन आहे. पुणेकर आमच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देतील, असा विश्वास भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि पुण्यात व्यक्त केलेला आहे. निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले आहेत. बुधवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पुण्याच्या विकासाचा चार ते पाच वर्ष मार्ग महाविकास आघाडी सरकारने नेला. त्यामुळे पुण्याचा विकास करण्यासाठी भाजपा सरकार येणे गरजेचे आहे. आमचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास केशव उपाध्ये यांनी व्यक्त केलेला आहे.

विकासासाठी आमचा उमेदवार निवडून द्या : पुणे मेट्रोचा 2005 ला ठराव झाला असताना सुद्धा अजून झाली नाही. पुण्यातल्या नागरिकांना संकटात नेण्याचे काम महाविकास आघाडीने केलेला आहे. आज शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते असलेले प्रचारातून येत आहेत, येथेच त्यांचा पराभव असल्याचे सुद्धा केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. पुण्याचा डीपी प्लॅन आहे. तो सुद्धा मोठ्या प्रमाणात उशिरा सुरू झाला, त्याला कारणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुण्याच्या विकासासाठी आमचा उमेदवार निवडून द्या, असे आवाहन सुद्धा त्यांनी केलेले आहे. कसबा विधानसभा पुणे मतदारसंघातले पुणे मेट्रो असेल, छोट्या सिटी बस प्रकल्प असतील, हे सगळे प्रकल्प आम्ही राबवले. जनतेचे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्या काळात होणारे काम आणि आमच्या काळात आलेल्या सरकार यामुळे पुण्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. पुण्याला एक उच्च प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचे उमेदवार निवडून येतीलच आणि पुणेकर त्यांना निवडून देतील असे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे.

हेही वाचा : Nana Patole: मोदी सत्तेला विरोध करणारे कसबा हे देशातील पहिले ठिकाण ठरेल -पटोले

Last Updated : Feb 23, 2023, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.