ETV Bharat / state

Minister Mangal Prabhat Lodha : जखमी गोविंदाला मंत्री मंगलप्रभात लोढांकडून एका लाखाची मदत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 9:11 PM IST

Minister Mangal Prabhat Lodha : मुंबई शहर आणि उपनगरात दहीहंडी उत्सवादरम्यान थरावर थर लावताना जखमी झालेल्या गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या जखमी गोविंदाची पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाऊन घेतलीय. या जखमी गोवींदांना सर्वोपरी उत्तम उपचार दिले जावे असं त्यांनी डॉक्टरांना सांगित, एका लाखांची मदत देखील केली आहे.

जखमी गोविंदाला मंत्री मंगल प्रभात लोढांनी केली एका लाखाची मदत
जखमी गोविंदाला मंत्री मंगल प्रभात लोढांनी केली एका लाखाची मदत

जखमी गोविंदाची मंत्री मंगलप्रभात लोढांकडून विचारपूस

मुंबई Minister Mangal Prabhat Lodha : मुंबई शहर आणि उपनगरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दहीहंडी उत्सवादरम्यान थरावर थर लावताना अनेक ठिकाणी थर कोसाळ्याल्या घटना घडल्या होत्या. यात अनेक गोविंदा जखमी झाले होते. जखमी झालेल्या गोविंदांवर महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदाची भेट घेतलीय. यावेळी त्यांनी गोविंदाला एक लाख रुपयांची मदतदेखील केली. (Injured Govinda)

उत्तम उपचार द्या : दहीहंडीच्या उत्सवामध्ये थरावर थर लावतांना सुरज कदम नावाचा गोविंदा दुसऱ्या थरावरुन कोसळून गंभीर जखमी झाला होता. त्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. याविषयी माहिती घेतल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी थेट केईएम रुग्णालय गाठत जखमी गोविंदा सुरज चव्हाणची भेट घेऊन विचारपूस केलीयं. तसेच तब्येतीची काळजी घेण्याबाबत सल्ला देखील दिलायं. यावेळी सुरजवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत सुरजच्या आरोग्याविषयी महिती जाणून घेत, सुरजला सर्वोपरी उत्तम उपचार दिले जावं असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलंय. मंत्री मंगलप्रभात लोढा (Tourism Minister Mangal Prabhat Lodha) यांनी सुरजची भेट घेतल्यानंतर वैयक्तिकरित्या एका लाखाची मदत केलीय. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत देखील देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलयं.

शासन सर्वतोपरी मदत करेल : दही हंडी उत्सवात थरावरून कोसळून सुरज कदम या गोविंदाचा अपघात झाला होता. यात त्याला छातीपासून खालच्या शरीराला मार लागला होता. या जखमी गोविंदला भेटण्यासाठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा केईएम रुग्णालयात गेले होते. ही घटना दुर्दैवी असून, यात जखमी झालेल्या गोविंदाला शासन सर्वतोपरी मदत करेल, असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलयं.

हेही वाचा :

  1. Dahi Handi Govinda News: गोविंदा रे गोविंदा! दहीहंडी फोडताना मुंबईत ७७ तर ठाण्यात ११ 'गोविंदा' जखमी
  2. Dahi Handi 2023 : महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या गोविदांना पोलिसांची तंबी
  3. Govinda Died : दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या दुसऱ्या गोविंदाचाही मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.