ETV Bharat / city

Govinda Died : दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या दुसऱ्या गोविंदाचाही मृत्यू

author img

By

Published : Oct 8, 2022, 4:05 PM IST

Died another Govinda injured while celebrating Dahi Handi
दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या दुसऱ्या गोविंदाचाही मृत्यू

मुंबईत दोन वर्षे कोरोना विषाणू प्रसारामुळे दहीहंडीसह इतर सण साजरे करण्यात आले नव्हते. यंदा विषाणूचा प्रसार कमी झाल्याने दहीहंडी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. मुंबईमधील विविध रुग्णालयात एकूण २२२ जखमी गोविंदा उपचारासाठी दाखल झाले होते. अनेक दिवसांपासून केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रथमेश सावंत या २१ वर्षीय दुसऱ्या गोविंदाचा मृत्यू ( Govinda Prathamesh Sawant during treatment ) झाला आहे.( Died another Govinda injured while celebrating Dahi Handi )

मुंबई - मुंबईत दोन वर्षे कोरोना विषाणू प्रसारामुळे दहीहंडीसह इतर सण साजरे करण्यात आले नव्हते. यंदा विषाणूचा प्रसार कमी झाल्याने दहीहंडी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. मुंबईमधील विविध रुग्णालयात एकूण २२२ जखमी गोविंदा उपचारासाठी दाखल झाले होते. अनेक दिवसांपासून केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रथमेश सावंत या २१ वर्षीय दुसऱ्या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी १९ ऑगस्टला संदेश दळवी या २४ वर्षीय तरूणाचा देखील मृत्यू झाला होता.( Died another Govinda injured while celebrating Dahi Handi )

Died another Govinda injured while celebrating Dahi Handi
केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रथमेश सावंत या २१ वर्षीय दुसऱ्या गोविंदाचा मृत्यू

फूड डिलिव्हरी बॉय प्रथमेश सावंत - मुंबईमध्ये यंदा दहीहंड्या थरावर थर लावून फोडण्यात आल्या. १९ ऑगस्टला घाटकोपर येथे दहीहंडी साठी थर लावताना ७ व्या थरावरून पडून प्रथमेश सावंत हा गोविंदा जखमी झाला होता. त्याला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा आज मृत्यू झाला आहे. प्रथमेश सावंत हा २१ वर्षाचा असून तो फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. प्रथमेश सावंत रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ, सिंधू सकपाळ, अनिल कोकीळ यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली होती.


संदेश दळवीचा मृत्यू - मुंबईमध्ये बामणवाडा विलेपार्ले पश्चिम येथे १९ ऑगस्टला दहीहंडी फोडताना संदेश दळवी हा २४ वर्षीय गोविंदा जखमी झाला होता. रात्री ११ च्या सुमारास त्याला पालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी २१ ऑगस्टला डामा डिस्चार्ज घेवून त्याला नानावटी या खासगी रुग्णालयात दाखल केले. २२ ऑगस्टला संदेश दळवीचा रात्री ९ वाजता मृत्यू झाला.


२२२ गोविंदा जखमी - मुंबईत १५०० हून अधिक मंडळे आहेत. ही मंडळे मुंबईत सर्वत्र फिरून राजकीय पक्ष, नेते, संस्था यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला भेट देवून उंच थर लावून सलामी देणे, दहीहंडी फोडत असतात. या बदल्यात या मंडळांना आयोजन कर्त्यांकडून रोख बक्षिसे दिली जातात. जास्तीत जास्त बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न मंडळांचा असतो. याच दरम्यान दहीहंडीसाठी थर लावताना मुंबईत २२२ गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी २ गोविंदांचा मृत्यू झाला आहे. गेले दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे दहीहंडी हा सण साजरा झाला नव्हता. यंदा निर्बंध शिथिल केल्याने सर्व सण साजरे करा असे सांगत दहीहंडीच्या थरावर कोणतीही मर्यादा घालण्यात आली नव्हती. तसेच जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्या गोविंदांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.