ETV Bharat / state

Sudhir More Suicide Case : सुधीर मोरे आत्महत्या प्रकरण; आरोपी महिलेची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 2:43 PM IST

Sudhir More Suicide Case : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाल्यानं खळबळ उडाली. सुधीर मोरे यांना महिला वकील ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्यांच्या मुलानं केलाय. या प्रकरणी महिला वकिलावर कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या महिला वकिलानं अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

Sudhir More Suicide Case
संग्रहित छायाचित्र

मुंबई Sudhir More Suicide Case : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक सुधीर सयाजी मोरे यांनी 1 सप्टेंबरला आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप माजी आमदार कन्येवर करण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेतील महिलेनं मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी धाव घेतली आहे. आज त्या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

रेल्वे मार्गावर आढळला मृतदेह : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुधीर सयाजी मोरे यांचा मृतदेह एक सप्टेंबर 2023 रोजी विद्याविहार घाटकोपर या रेल्वे मार्गावर आढळला होता. सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळल्यामुळं एकच खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचा शेवटचा संवाद एका वकील महिलेसोबत झाला होता. त्यामुळे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात सुधीर मोरे यांच्या मुलाच्या तक्रारीवर मुंबईतील वकील महिलेवर कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वकील महिला करत होती ब्लॅकमेल : सुधीर सयाजी मोरे यांच्या मुलानं यासंदर्भात कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन वकील महिलेवर कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत सुधीर मोरे यांच्या मुलानं, ही वकील महिला गेल्या दोन महिन्यापासून सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल करत होती. गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुधीर मोरे हे बॉडीगार्डला बरोबर न घेता घरातून बाहेर पडले होते. बाहेर पडताना खासगी बैठक असल्याचं त्यांनी घरच्यांना सांगितलं होतं. त्यानंतर मात्र त्यांचा मृतदेह मध्य रेल्वेच्या विद्याविहार घाटकोपर रेल्वे मार्गावर आढळला', अशी तक्रार केली. सुधीर मोरे यांच्या मुलाच्या तक्रारीमुळे वकील महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानं अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी वकील महिलेनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे.

शेवटचा कॉल केला महिला वकिलाला : वकील महिलेनं सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आल्यानं मुंबईत मोठी खळबळ उडाली. वकील महिला आणि सुधीर मोरे यांच्यात एका दिवसात तब्बल 50 ते 60 कॉल केल्याचं उघडकीस आलं होतं. सुधीर मोरे यांनी शेवटचा कॉलही या वकील महिलेला केला होता. त्यामुळे या वकील महिलेनं सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. कुर्ला पोलीस ठाण्यात या प्रकरणी महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या महिला वकिलानं सत्र न्यायालयात धाव घेतल्यानं या प्रकरणाची पुढील सुनावणी आज ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Sudhir More Committed Suicide: सुधीर मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती, शेवटपर्यंत 'त्या' महिलेशी सुरू होता संवाद
  2. Sudhir More Suicide Case: सुधीर मोरेंच्या आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट, अज्ञात महिलेचा शोध सुरू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.