ETV Bharat / state

Request Rejected By Court : दोन्ही बाजूंची संमती असेल तरच कंगणाला जावेद अख्तर मानहानी खटल्यातून सुट

author img

By

Published : Mar 22, 2022, 8:06 PM IST

गीतकार जावेद अख्तर यांच्या मानहानीच्या खटल्यातून कायमची सूट देण्याची विनंती कंगना रणौतने मुंबईच्या अंधेरी कोर्टात केली होती. तक्रारदार आणि आरोपी अशा दोन्ही बाजूंची संमती असल्यास तीला सूट दिली जाईल असे न्यायालयाने सांगितले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 7 एप्रिलला होणार आहे.

मुंबई: ज्येष्ठ पटकथा लेखक कवी जावेद अख्तर ( Javed Akhtar Defamation ) यांनी अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार जावेद अख्तर यांनी वकील जय भारद्वाज यांच्यामार्फत केली आहे.

याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नव्हती. कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही, तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल.

त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

या प्रकरणात कंगणाने या खटल्यातून कायमची सूट देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती फेटाळली आहे मात्र जर तक्रारदार आणि आरोपीं अशा दोन्ही बाजुची संमती असेल तर सूट देता येईल असे म्हणले आहे.

  • Mumbai's Andheri court has rejected Kangana Ranaut's plea for permanent exemption from appearance in defamation case by lyricist Javed Akhtar against her, saying that she will be exempted if needed by consent of both (complainant & accused) sides. Matter adjourned for April 7 pic.twitter.com/QZr6ocx7Ym

    — ANI (@ANI) March 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.