ETV Bharat / state

Jumbo Covid Center Scam : जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडी ॲक्शन मोडमध्ये; 8000 हजार पानांच आरोपपत्र दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 10:07 AM IST

Jumbo Covid Center Scam : मुंबईभर गाजलेल्या कथित शंभर कोटी रुपयांच्या जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यात आता ईडी ॲक्शन मोडमध्ये आलीय. ईडीकडून याप्रकरणी न्यायालयात 8000 हजार पानांच आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

Jumbo Covid Center Scam
Jumbo Covid Center Scam

मुंबई Jumbo Covid Center Scam : मुंबईतील कोविड केंद्रात बेकायदा आर्थिकव्यवहार झाल्याच्या आरोपात सुजित पाटकर कोठडीत आहे. याप्रकरणी आता ईडीनं न्यायालयात 8000 पानी आरोप पत्र दाखल केलंय. त्यात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून सुजित पाटकर आणि डॉक्टर बिसुरे यांचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे.


8000 हजार पानांच आरोपपत्र : मुंबईभर गाजलेल्या कथित शंभर कोटी रुपयांच्या जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून केला गेला होता. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना बेकायदेशीररित्या कंत्राट दिल गेल्याचा दावा करण्यात आला. तसेच बोगस बनावट बिले दाखवून अतिरिक्त नफा मिळवला गेला, असा आरोप सुजित पाटकर आणि डॉक्टर बिसुरे यांच्यावर करण्यात आलाय. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत पीएमएलए न्यायालयात सुजित पाटकर यांना हजर करण्यात आलं होतं. त्यावेळेला अंमलबजावणी संचालनालयनं आरोपपत्र दाखल केलं. आठ हजार पानाच्या या आरोपपत्रासोबत एक सीडी देखील त्यात जोडलेली आहे. त्याची छाननी कोर्ट करणार आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्याकडं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.



अर्धे कर्मचारी कामावर असताना पूर्ण दाखवली उपस्थिती : या कोवीड सेंटरवर 50 ते 60 टक्केच कर्मचारी कामावर असताना शंभर टक्के कर्मचारी कामावर असल्याचं दाखवलं गेलं. त्यासाठी बनावट बिलं आणि कागदपत्रं सादर केली गेली. त्यात बीएमसीकडून 31 कोटी 84 लाख रुपये प्राप्त केले. त्यामुळेच या संदर्भातील आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील तपास करणं जरुरी असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. पुढील काही दिवसात ह्या आरोपपत्राच्या आधारे सुनावणी अपेक्षित आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Session Court Order: जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; तुरुंगात सुजित पाटकरांना ऑर्थोबेड उपलब्ध करा; सत्र न्यायालयाचे आदेश
  2. Covid Center Scam Case : कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; अखेर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
  3. Covid Center Scam Case Update: कोविड सेंटर घोटाळा प्रकरण: सुजित पाटकरांना ईडी कोठडी तर डॉ किशोर बिसुरेंना न्यायालयीन कोठडी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.