ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलन प्रकरणी, गुणरत्न सदावर्ते यांची उच्च न्यायालयात याचिका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 7:11 PM IST

Maratha Reservation: गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा अशी विनंती सदावर्ते यांनी याचिकेद्वारे केली आहे.

Maratha Reservation
गुणरत्न सदावर्ते

मुंबई Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर शासनाने काही निर्णय घेतले. शासनाचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला देखील गेलं आहे. परंतु राज्यभरात हिंसक आंदोलने झाली. लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडल्या. काहींच्या घरांना आग लावली. या हिंसक प्रकरणांमध्ये न्यायालयानं शासनाला आदेश देण्याबाबत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 8 नोव्हेंबर 2023 रोजी न्यायालयानं त्यावर सुनावणी निश्चित केलेली आहे. 2 नोव्हेंबर रोजी ही याचिका उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली.




कुठे मुंडन तर कुठे गावबंदी : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठवाड्यामधून आंदोलन पुकारलं. अंतरवाली सराटी याठिकाणी त्यांचा आंदोलनाचा उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. या आंदोलनानंतर राज्यात ठिकठिकाणी उपोषण, मुंडन, गावबंदी अशा प्रकारची आंदोलनं सुरू झाली आहेत.


141 ठिकाणी जाळपोळीच्या घटना : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात काही दुसरेच लोक घुसतात आणि ते हिंसक आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सार्वजनिकरित्या माध्यमांशी बोलताना शासनावरच आरोप केले होते. महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत ठिकठिकाणी 168 जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात 141 ठिकाणी जाळपोळीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.




आंदोलनात बारा कोटी रुपयांचं नुकसान : राज्यामध्ये शासनाच्या मालकीच्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसना आग लावण्यात आली. चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. या एकूण सगळ्या मालमत्तेचं झालेलं नुकसान 12 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं देखील पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या हिंसाचाराच्याबाबत उच्च न्यायालयानं शासनाला आदेश देण्याबाबत याचिका दाखल केली आहे.



हेही वाचा -

  1. Maratha Reservation Row : सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा व्हिडिओ
  2. Satish Maneshinde : मराठा आरक्षण आंदोलकांचा खटला मोफत लढवणार; अ‍ॅड सतीश मानेशिंदे यांची माहिती
  3. Gunaratna Sadavarte News : स्वतःची कार जाळणाऱ्या 'त्या' मराठा कार्यकर्त्यानं फोडली सदावर्तेंची कार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.