ETV Bharat / state

Governor Controversial Statement : राज्यपाल नाखूश! पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा केला एकेरी उल्लेख

author img

By

Published : Jan 8, 2023, 7:33 AM IST

Updated : Jan 8, 2023, 9:08 AM IST

Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा नव्याने यात भर पडली आहे. मुंबईत शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांचा एकेरी नावाने उल्लेख केला (controversial statement about shivaji maharaj) आहे. तसेच त्यांनी राज्यपाल झाल्यानंतर नाखूश असल्याचे वक्तव्यही केले (Governor unhappy in Maharashtra) आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई : राज्यपाल (Governor Bhagat Singh Koshyari) महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख, नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का? अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमोल मिटकरी यांनी केली (controversial statement about shivaji maharaj) आहे.

राज्यपाल नाखूश : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Koshyari unhappy in Maharashtra) यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्यपाल झाल्यानंतर ते नाखूष आहेत आणि त्यांना वाटते की, ते योग्य ठिकाणी नाहीत. कोश्यारी म्हणाले, मला वाईट वाटते, मी आनंदी नाही. ते म्हणाले की, जेव्हा संन्यासी राजभवनात येतात तेव्हाच त्यांना आनंद आणि योग्य ठिकाण वाटते. कोश्यारी जैन समाजाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. तेव्हा ते म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यानंतर मी आनंदी ( Governor unhappy in Maharashtra) नाही.


तीर्थक्षेत्र मंत्रालयाची मागणी : भविष्यात तीर्थक्षेत्र उद्योग सुरू करण्याची विनंतीही त्यांनी सरकारला केली. मी सरकारला 'पर्यटन मंत्रालय' सारखे तीर्थक्षेत्र मंत्रालय तयार करण्याची विनंती करतो. कारण तीर्थयात्रेला स्वतःचे मोठेपण असते, असे राज्यपाल पुढे म्हणाले. राज्याच्या पर्यटन विभागातर्फे शुक्रवारी राजभवन येथे 'पवित्र जैन तीर्थक्षेत्र दर्शन सर्किट'चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि वैष्णोदेवी मंदिर मंडळाचे सदस्य महामंडलेश्वर श्री विश्वेश्वर आनंद गिरी जी महाराज हे देखील उपस्थित होते. भगतसिंग कोश्यारी यांची सप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली (controversial statement about shivaji maharaj) आहे.

यापूर्वीचे वादग्रस्त विधान : वादग्रस्त विधाने करण्यात राज्यपालांनी मागील वर्षभरापासून रेकॉर्ड मोडला आहे. महापुरुषांना देखील त्यांनी सोडलेले नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. राज्यपाल म्हणाले होते की, 'कल्पना करा की सावित्री बाईंचे लग्न 10 वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुले वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असे वक्तव्य करुन अकलेचे तारे तोडले होते. राज्यात यानंतर अनेक संघटनांनी आक्रमक होत, राज्यपालांच्या निषेधार्थ जाळपोळ केली होती. भाजपने यावेळी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले (Governor Controversial Statement) होते.

Last Updated :Jan 8, 2023, 9:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.