ETV Bharat / state

Mumbai Best Bus: मुंबईत प्रथमच सत्र न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेस्ट बस सेवा

author img

By

Published : Mar 28, 2023, 12:46 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सत्र न्यायालय मुंबई या ठिकाणी आज पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर बेस्ट बस सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी बेस्टच्या अपेक्षा पेक्षा दुप्पट लोक या बसमध्ये चढताना दिसले.

Best bus will start from today
सत्र न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेस्ट बस सुरू

सत्र न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेस्ट बस आजपासून सुरू

मुंबई : मुंबईत सत्र न्यायालय ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकापर्यंत बस धावण्यास आजपासून सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सत्र न्यायालयापर्यंत 200 पेक्षा अधिक न्यायालयीन कर्मचारी रोज वेगवेगळ्या खाजगी वाहनाने प्रवास करतात. वकीलांना वेळेवर सकाळी कार्यालयात पोहोचायचे असते. न्यायालयीन कामकाजामध्ये शिस्तबद्धता आणि वेळेचे पालन करावे लागते. त्यामुळे अनेक कर्मचारी हे लवकर येतात. त्यासाठी खाजगी वाहनाचा किंवा बेस्ट बसचा वापर करताता. परंतु यावर बेस्टकडे या संदर्भात वकील असोसिएशन यांनी मागणी केली होती. त्यामुळे बेस्टने आता आजपासून ही बेस्ट बस सुरू केली.



पहिल्यांदाच बेस्ट बस सुरू: सुमारे तीन महिन्यापासून याबाबत वकील असोसिएशनचे पदाधिकारी अडवोकेट रवी जाधव यांनी मुंबई बेस्ट बस व्यवस्थापनाकडे अर्ज दाखल केला होता. त्याचा पाठपुरावा त्यांनी सुरू केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आल्याचे सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वाटत आहे. आज अचानक सर्व कर्मचारी मंडळी बसकडे धावताना दिसले. रोज शांतपणे प्रमाणे चालणारे वकील आज चक्क बसमध्ये जागा पकडण्यासाठी धावत होते. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की आज पहिल्यांदाच इतिहासात बेस्ट सुरू झाली आहे. त्याचा आंनद होत आहे.



यासाठी केले प्रयत्न: यासंदर्भात वकील असोसिएशन संघटनेचे प्रमुख अडवोकेट रवी जाधव यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. त्यांनी याबाबत माहिती दिली की, गेले तीन महिने आम्ही बेस्ट बस सत्र न्यायालयापासून छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही पहिली बस सुरू झाली आहे. यामध्ये सत्र न्यायालयाचे असिस्टंट सुप्रीटेंडंट मुंडे तसेच बेस्ट व्यवस्थापनाचे शिरसाट या पदाधिकारी मंडळींचे सहकार्य लाभले आहे. बेस्ट बसला खात्री नव्हती की, बेस्ट बस जर या ठिकाणी सोडली तर ती भरून जाईल. आज दुपटीने बेस्टमध्ये न्यायालयीन कर्मचारी चढले. जनतेच्या हितासाठी नव्या युगात अशा सेवा, सुविधा प्रत्येकालाच मिळायला हव्यात.



बेस्ट बसचे व वकीलांचे मानले आभार: बेस्ट बसमधील चढलेल्या प्रवाशांना विचारल्यावर त्यांनी देखील सांगितली की, खूप छान वाटत आहे. आता रोज घरी वेळेत जाता येईल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात वेळेत आम्हाला पोहोचता येईल. त्यामुळे बेस्ट बसचे देखील आभार आणि यासाठी पाठपुरावा करणारे आमच्या वकील मंडळींचे देखील त्यांनी आभार मानले. तसेच मुंबईची जीवननवाहिनी म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाची शान म्हणू डबलडेकर बसची ओळख आहे.

हेही वाचा: Best Employee मुलाच्या आजारपणात सुटी घेणाऱ्या कर्मचाऱ्याला बेस्टचा नारळ न्यायालयाने दिले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.