ETV Bharat / state

Fire In Mumbai : कुर्ला झोपडपट्टी परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 8:05 AM IST

Updated : Sep 8, 2023, 2:56 PM IST

कुर्ला परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Fire In Mumbai
झोपडपट्टीला लागलेली भीषण आग

मुंबई Fire In Mumbai : कुर्ला परिसरातील कुरेशी नगर पूर्वेकडं असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ( Fire In Mumbai ) मिळवण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

झोपडपट्टीला भीषण आग : मुंबई शहरातील कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगर इथंल्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली. या परिसरात असलेल्या झोपडपट्टीला आग लागल्यानं नागरिकांची मोठी धावपळ झाली. या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेतली. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोणतीही जीवितहानी नाही : कुर्ला परिसरातील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं आहे. परिसरातील नागरिकांना घटनास्थळावरुन सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीत झोपड्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईत वाढल्या आगीच्या घटना : मायानगरी मुंबईत गेल्या काही दिवसापासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पुढं आलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात आगीच्या सहा मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

हेही वाचा :

  1. Fire in Residency : भायखळा येथील ६ ते ७ झोपड्यांना आग; आग विझवण्याचा प्रयत्न सुरू
  2. Mumbai Fire News : मानखूर्दमधील भंगार कंपाउंडला भीषण आग, मोठे नुकसान झाल्याचा अंदाज
  3. Fire Break Out In Chembur : चेंबूरसह भिवंडीतही आगीचे तांडव, स्वस्तिक चेंबरच्या चौथ्या मजल्यावर तर भिवंडीत गोडाऊनला आग
Last Updated : Sep 8, 2023, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.