Fire Break Out In Chembur : चेंबूरसह भिवंडीतही आगीचे तांडव, स्वस्तिक चेंबरच्या चौथ्या मजल्यावर तर भिवंडीत गोडाऊनला आग

author img

By

Published : May 25, 2023, 8:40 AM IST

Updated : May 25, 2023, 11:41 AM IST

Fire Break Out In Chembur

मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या स्वस्तिक चेंबरच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली.मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. तर दुसऱ्या घटनेत भिवंडीतील गोडावूनला भीषण आग लागली. मात्र यादोन्ही घटनेत कोणतीही जीवितहान ीझाली नाही.

मुंबई : शहरातील चेंबूर परिसरात असलेल्या स्वस्तिक चेंबरच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तर दुसऱ्या घटनेत भिवंडीतील गोडावूनला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. भिवंडीत लागलेल्या आगीतही कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • #WATCH | Mumbai: Fire broke out in Chembur's Swastik Chamber. Four fire engines were sent to the spot and the fire was doused. No casualty was reported. pic.twitter.com/q7WUNbHh2Y

    — ANI (@ANI) May 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जवानांनी आणली आग अटोक्यात : चेंबूर येथील स्वास्तिक चेंबर नावाची इमारत असून या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना येथील नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्शळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

भिवंडीत पुन्हा अग्नीतांडव; पहाटेच्या सुमारास भंगार गोदामाला भीषण : भिवंडी तालुक्यातील काटई गाव परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका भंगार गोदामाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीचे कारण अजूनही समजू शकले नसून या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न होते. मात्र लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल तीन तासानंतर यश आले. सध्या घटनास्थळी कुलींगचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा -

  1. IAS Officers Maharashtra : आयएएस अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे प्रशासनाचा वाढला ताण, राज्य सरकारने केंद्राकडे 'ही' केली मागणी
  2. Mumbai News: उघडी मॅनहोल्स मृत्यूचा सापळा बनणार नाहीत, याची काळजी घ्या-उच्च न्यायालयाचे बीएमसीला निर्देश
  3. Mumbai Police Death : दोन दिवसाआड होते एका पोलिसाचा मृत्यू; धक्कादायक वास्तव आले समोर
Last Updated :May 25, 2023, 11:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.