ETV Bharat / state

District Renamed : आता जिल्ह्यांचं नावही बदललं; म्हणा, 'छत्रपती संभाजीनगर अन् धाराशिव' जिल्हा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 10:03 AM IST

Updated : Sep 16, 2023, 10:47 AM IST

file photo
फाईल फोटो

Aurangabad Osmanabad District Renamed : औरंगाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचं नावंही बदललं आहे. आता जिल्ह्याचं नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलंय. तर उस्मानाबाद जिल्ह्याचंही नाव धाराशिव करण्यात आलंय. राज्य सरकारनं शुक्रवारी (15 सप्टेंबर) याबाबतचं राजपत्र जारी केलंय.

मुंबई : Aurangabad Osmanabad District Renamed : याआधी औरंगाबाद शहर (Aurangabad City) आणि उस्मानाबाद (Osmanabad City) शहरांचं नाव बदलण्यात आलं होतं. आता नवे राजपत्र काढत (Gazette Release) दोन्ही जिल्ह्याचं नाव बदलली आहेत. त्यामुळं आता उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव (Dharashiv District) आणि औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar District) असणार आहे.

शहरांच्या नावात आधीच बदल : औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहर या दोन्ही शहरांची नावं याआधीच बदलण्यात आली होती. मात्र, त्यावेळी जिल्ह्यांची नावं जशास तशी ठेवण्यात आली होती. आता राज्य सरकारनं राजपत्र काढत दोन्ही जिल्ह्यांच्या नावात बदल केलाय. त्यामुळं आता औरंगाबाद जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्हा हा धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे.

gazette
सरकारकडून राजपत्र प्रसिद्ध

सरकारचा मोठा निर्णय : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी दिनाच्या एक दिवस अगोदर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव "धाराशिव' करण्यात आलंय. उस्मानाबादच्या नामांतराबाबत दोन गट न्यायालयीन लढाई लढत होते. औरंगाबादच्या खंडपीठात हे प्रकरण सध्या सुरू आहे.

सरकारकडून राजपत्र प्रसिद्ध : राज्य सरकारनं राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळं अखेर जिल्हा, तालुका आणि गावांच्या नावापुढं 'धाराशिव जिल्हा' आणि 'छत्रपती संभाजीनगर जिल्हा' असं नमूद केलं जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचं, तालुक्याचं, उप विभागाचं नाव आता धाराशिव असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.

न्यायालयीन लढाई सुरू : बऱ्याच वर्षांपासून उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न रेंगाळलेला होता. शिंदे सरकार आल्यानंतर याबाबत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर नावाचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली होती. धाराशिवच्या विरोधात 28 हजार हरकती दाखल करण्यात आल्या होत्या आणि समर्थनात अवघे 175 अर्ज असल्याची माहिती खलील सय्यद यांनी दिली. तसेच हा निर्णय गडबडीत घेण्यात आला असून, राज्य सरकारनं सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, ते पाळले नाही. त्यामुळं आम्ही याबाबत पुन्हा न्यायालयात दाद मागून यावर स्टे घेणार असल्याचं खलील सय्यद यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Rename Osmanabad : उस्मानाबादचे नाव बदलण्यास केंद्राचा हिरवा कंदील, औरंगाबाद मात्र प्रतीक्षेत
  2. Aurangabad And Osmanabad Name Change: हरकती न मागवता निर्णय कसा घेतला? औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरणावर खंडपीठाने केला सवाल
  3. Aurangabad Osmanabad Rename : आता शहरासह संपूर्ण जिल्हाच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव झाला; राजपत्र जारी
Last Updated :Sep 16, 2023, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.