ETV Bharat / state

गुजरातला हिरे उद्योग स्थलांतरित होणार नाही - देवेंद्र फडणवीस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 7:17 PM IST

Diamond industry गुजरातला हिरे उद्योग स्थलांतरित होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत बोलत होते.

फडणवीस
फडणवीस

मुंबई Diamond industry : सुरत हे डायमंड मार्केट आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते मार्केट आहे. सुरतमध्ये डायमंड उत्पादन 2013 मध्ये सुरू झालं. आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि उत्पादन होते. सुरतला जरी मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी होत असलं किंवा त्यांनी नवीन ग्रुप चालू केला असला आपल्याकडील एकही उद्योग तिकडे स्थलांतरित झालेला नाही. मुंबई मधल्या भारत डायमंड गुड्सच्या लोकांनी सांगितलं, आम्ही कोणीही शिफ्ट होणार नाही. उलट आमच्याकडे उद्योग वाढतो आहे. आता भारतामध्ये 38 बिलियन डॉलर इतकी जेम्स आणि ज्वेलरीची निर्यात ही आपण एकट्या मुंबईतून करतो. जी एकूण निर्यातीच्या 75 टक्के असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात केला.

निर्यातीची परवानगी द्या - साधारणपणे 97 टक्के जेम्स आणि ज्वेलरी निर्यात एकट्या मुंबईतून होते आहे. मात्र कधीकधी आपल्या निर्णयाचा परिणाम कसा होतो. कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने भारत डायमंड आपल्याला सांगत होता की, आम्हाला निर्यातीची परवानगी द्या. पण तत्कालिन सरकारने आठ महिने ही परवानगी दिली नाही. केवळ कागदोपत्री परवानगी द्यायची होती पण ती दिली नाही. त्यामुळे या काळात निर्यात सात टक्क्यांनी खाली आली होती, असे फडणवीस यांनी सांगतिले. मात्र आता २२- २३ आणि २३-२४ चा आतापर्यंतचा आहे मुंबई ९७.१३ टक्केवारी गेली आणि सुरत खाली आली आहे.

नवीन जेम्स आणि ज्वेलरी पार्क - मुंबईमध्ये आपण नवीन जेम्स आणि ज्वेलरी पार्कला जागा दिली आणि त्याचे काम सुरू झालेलं आहे. देशातला सर्वात आधुनिक जेम्स आणि ज्वेलरी पार्क तुर्की येथे ज्या प्रकारचे पार्क झाला तसाच पार्क या ठिकाणी आपला होतोय. तुर्की, इटली आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला आणि त्या कराराप्रमाणे मुंबईमध्ये उत्पादन केंद्र तयार करण्याचं ठरलेलं आहे. त्यानंतर मेगा सीएफसी केंद्र सरकारने जो दिला तोही मुंबईला दिलाय. हा जो काही पार्क आपण करतोय या पार्कमध्ये देशातील सगळ्यात मोठी कंपनी मलाबार गोल्ड यांनी सतराशे कोटी रुपयांची गुंतवणूक मुंबईत केली. आता त्यांनी देशभराचे हेड ऑफिस हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यांनी सुद्धा आपल्याकडे गुंतवणूक केली आहे. एवढंच नाही तर तुर्की डायमंड टूर्स आता मुंबईमध्ये येण्याचं निश्चित केलंय.

मुंबई ही मुंबई आहे - 2030 पर्यंत हिरे उद्योग 75 बिलियन डॉलर्स वर नेण्याची घोषणा ही आपल्या पंतप्रधानांनी केलेली आहे. त्यामुळे त्याचा फायदा आता मुंबईला होणार आहे. आता अन्य राज्यांतही उद्योग वाढतील. काही राज्ये प्रयत्न करतील की अशा प्रकारचा उद्योग त्यांच्या राज्यात आला पाहिजे. मात्र त्याचा मुंबईवर कुठला परिणाम झालेला नाही. मुंबई ही मुंबई आहे, मुंबईसोबत कोणीही स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे आपण मनातून भीती काढून टाका की मुंबईतले उद्योग सुरतला जातील ते कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी सभागृहात दिली.

हे वाचलंत का...

  1. आदित्य ठाकरेंना घेऊन एकदा बाळासाहेब संघात आले होते - भरत गोगावले
  2. 'मॉब लिंचिंगसाठी फाशीची शिक्षा, देशाविरुद्ध बोलल्यास जेलची हवा', लोकसभेत फौजदारी कायदा सुधारणा विधेयकं मंजूर
  3. सरकारला फक्त 'मन की बात' करायची आहे, त्यांना 'जन की बात' ऐकायची नाही - डॉ. अमोल कोल्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.