ETV Bharat / state

DHFL Fraud Case : आरोपी वाधवान बंधूंना रुग्णालयात अलिशान सेवा; सात पोलिसांचं निलंबन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 12:36 PM IST

Updated : Aug 30, 2023, 1:00 PM IST

DHFL Fraud Case
संग्रहित छायाचित्र

येस बँक आणि डिएचएफएल घोटाळ्यातील आरोपी वाधवान बंधूंना रुग्णालयात अलिशान सेवा देणाऱ्या सात पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. या पोलिसांनी वाधवान बंधूंला मुंबईतील रुग्णालयात अलिशान सेवा दिल्याचं उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

मुंबई : डिएचएफएल घोटाळ्यातील आरोपी असलेल्या वाधवान बंधूंला अलिशान सेवा देणाऱ्या सात पोलिसांना मोठा दणका दिला आहे. तळोजा कारागृहातून मुंबईतील रुग्णालयात तपासणीदरम्यान वाधवान बंधूंला अलिशान सेवा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या सात पोलिसांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं बुधवारी वृत्तसंस्थेला दिली आहे.

वैद्यकीय तपासणीला नेताना अलिशान सेवा : वाधवान बंधू तळोजा येथील कारागृहात कैद आहेत. त्यांना मुंबईतील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेण्यात येत असताना अलिशान सेवा देण्यात आल्याचं पुढं आलं आहे. वाधवान बंधूंला अलिशान सेवा देण्यात आल्याचा व्हिडिओ पुढं आल्यानं मोठी खळबळ उडाली होती.

सात पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन : डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी वाधवान बंधूंंला विशेष सेवा बजावल्यानं सात पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. या पोलिसांनी आरोपी वाधवान बंधूंला मुंबईतील रुग्णालयात नेताना ही सेवा दिली होती. वाधवान बंधूंला वैद्यकीय तपासणीच्या वेशात अलिशान सेवा पुरवल्याचं उघड झाल्याचं या अधिकाऱ्यानं बुधवारी सांगितलं. त्यामुळे पोलीस दलातील सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.

धीरज वाधवानला न्यायालयाचा दणका : डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी धीरज वाधवान यानं मुंबई उच्च न्यायालयात वैद्यकीय उपचारासह विशेष अधिकार मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयानं वैद्यकीय सेवा देण्यात येतील, मात्र धीरज वाधवानची कोणत्याही विशेष अधिकाराची मागणी पूर्ण करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं धीरज वाधवानची याचिका फेटाळून लावली आहे.

हेही वाचा :

  1. Rana Kapoor Bail : डीएचएफएल फसवणूक प्रकरण, राणा कपूर यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी
  2. DHFL Bank Scam : डीएचएफएल बँक घोटाळ्यातील आरोपी धीरज वाधवानचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला
  3. DHFL Fraud Case : डीएचएफएल फसवणूक प्रकरणातील धीरज वाधवानला मिळेल वैद्यकीय मदत, मात्र विशेष अधिकार मिळणार नाहीत, उच्च न्यायालयाचे निर्देश
Last Updated :Aug 30, 2023, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.