ETV Bharat / state

Cyber Crime News : स्वतःचा क्यूआर कोड वापरुन मॅनेजरचा कंपनीतच ४८ लाखांचा अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 10:01 PM IST

Cyber Crime News : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जिवाया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं वेलनेस सेंटरसह स्पा सर्व्हिस सेंटरच्या मॅनेजरनं स्वतःच्या क्यूआर कोडचा वापर करुन कंपनीच्या सुमारे ४८ लाखांचा अपहार केल्याचं समोर आलयं.

स्वतःचा क्यूआर कोड वापरुन मॅनेजरचा आपल्या कंपनीतच ४८ लाखांचा अपहार
Cyber Crime News

मुंबई Cyber Crime News : स्वतःच्या क्यूआर कोडचा वापर करुन कंपनीच्या सुमारे ४८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी एका वेलनेस सेंटरच्या मॅनेजरविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा नोंदविलाय. अंधेरी परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत. गुरदिपसिंग रघुवीरसिंग मठरु असं या मॅनेजरचे नाव असून तो डोबिवलीच्या शास्त्रीनगरमधील रहिवाशी आहे. गुरदिपसिंगनं गेल्या एका वर्षात ही फसवणुक केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं असून, लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. (Andheri Cyber Crime News)

कंपनीऐवजी स्वतःच्या क्यूआर कोडवर ग्राहकांच पेमेंट : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जिवाया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं वेलनेस सेंटरसह स्पा सर्व्हिस सेंटर आहे. या स्पा सर्व्हिस सेंटरमध्ये जून २०२१ पासून गुरदिपसिंग मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांची एक टिमही तिथं कार्यरत होती. जुलै महिन्यात जिवाया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हेड निर्मल चौधरींना फोन करुन त्यांच्या या स्पा सर्व्हिस सेंटरचा मॅनेजर गुरदिपसिंग हा ग्राहकांकडून मिळणारं पेमेंट काऊंटरमधील कंपनीच्या क्यूआर कोडवर न घेता स्वतःच्या क्यूआर कोडवर घेत असल्याचे एका अज्ञात व्यक्तीनं सांगितलं. यामुळे ग्राहकांकडून मिळणारं पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा न होता त्याच्या बँक खात्यात जमा होत होती. हा सर्वप्रकार निदर्शनास येताच त्यांनी याची शहानिशा सुरु केली. गेल्या एका वर्षाचं ऑडिट तपासलं असता गुरदिपसिंगने वर्षभरात कंपनीच्या सुमारे ४८ लाख रुपयांचा अपहार केल्याचं दिसून आलं. यामुळं इंदौर येथील मुख्य कार्यालयातून निर्मल चौधरी स्वतः चौकशीसाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी कंपनीत कामाला असलेल्या सर्व कर्मचार्‍यांची चौकशी केली असता त्यांनी याला दुजोरा दिला.

शहानिशा केल्यावर गुन्हा दाखल : गुरदिपसिंग हा मॅनेजर असल्यानं याबाबत त्याला कोणीही विचारणा करत नव्हतं. गेल्या काही महिन्यांपासून तो ग्राहकांचे पेमेंट स्वतच्या क्यूआर कोडवर घेत होता. याप्रकरणी कंपनीचे हेड निर्मल चौधरींनी गुरुदिपसिंग मठरु याच्याविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविलाय. या गुन्ह्यांचा तपास सूरु असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

हेही वाचा :

  1. Cyber Crime in Maharashtra : वरिष्ठ पोलीस अधिकारीही हॅकर्सच्या टार्गेटवर, अधिकाऱ्यांचे फोटो लावून अनेकांना घालतायेत गंडा
  2. Social Media Account Hacking : पोलीस, शासकीय अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; अनेकांकडे पैशाची मागणी
  3. Cyber Financial Fraud Exposed : सायबर फ्रॉड करून कंपनीच्या खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्यात वळविण्यास भाग पाडले; दोघांना मध्य प्रदेशातून अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.