ETV Bharat / state

Mumbai Crime : गँगविरोधात साक्ष दिल्याने काॅलेज तरुणावर कटरने सपासप वार

author img

By

Published : May 28, 2023, 8:47 PM IST

मित्राला मारहाण करून टोळीविरोधात पोलिसांना जबानी दिल्याने भांडुपमध्ये गुरुवारी रात्री १९ वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अनिकेत गायकवाड नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

Students Attacked
Students Attacked

मुंबई : मित्राला झालेल्या मारहाणीनंतर गॅंग विरोधात पोलिसांत साक्ष दिल्याच्या रागातून चाैघांनी १९ वर्षीय विद्यार्थ्यावर भररस्त्यात कटरने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री भांडूपमध्ये घडली. याप्रकरणी भांडूप पोलिसांनी अनिकेत गायकवाड नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गँग विरुध्द साक्ष दिल्याने हल्ला : भांडूप पश्चिमेकडील हनुमान नगर परिसरात रहात असलेला शुभम पाठक (१९) हा ठाण्यातील एका फार्मसी काॅलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शुभमचा मित्र फैजल याला पोलीस अभिलेखावरील आरोपी सुजल जाधव याने मारहाण केली होती. फैजलच्या तक्रारीवरुन भांडूप पोलिसांनी जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात शुभमने जाधव विरोधात साक्ष दिली होती. याचाच राग जाधवला होता. तू आमच्या गँग विरुध्द साक्ष देतोस, मी सुटुन आल्यानंतर बघुन घेईन अशी धमकी त्याने शुभमला दिली होती. पूढे जाधवला या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यात अटक करण्यात आली. नुकताच तो सुटून जेल बाहेर आला. त्यावेळी त्याने शुभमवर हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.

कटरने शुभमच्या मानेवर वार : शुभम हा २५ मे च्या रात्री पावणे नऊच्या सुमारास येथील कोंबडी गल्ली परिसरातून जेवण आटोपून घरी जात होता. जाधव याच्यासह अनिकेत गायकवाड, साथीदार आर्यन आणि अन्य एका अनोळखी तरुणाने त्याला अडवले. गँगच्या विरोधात साक्ष देतोस आज तूला संपवून टाकतो असे, म्हणत त्यांनी शुभमला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जाधवने त्याच्याजवळील कटरने शुभमच्या मानेवर वार केला. गंभीर जखमी होऊन शुभम रस्त्यावर कोसळला. भररस्त्यात घडलेल्या हल्ल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मदतीसाठी पुढे येत असलेल्या स्थानिकांनाही या टोळीने धमकावत तेथून पळ काढला. मित्रांनी शुभमला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांअंती पोलिसांनी शुभमची फिर्याद नोंदवून घेत चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -

Terrorists Killed in Manipur : मणिपूर हिंसाचारानंतर आतापर्यंत 30 दहशतवादी ठार, आसाम रायफल्सची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.