ETV Bharat / bharat

Terrorists Killed in Manipur : मणिपूर हिंसाचारानंतर आतापर्यंत 30 दहशतवादी ठार, आसाम रायफल्सची कारवाई

author img

By

Published : May 28, 2023, 7:09 PM IST

Updated : May 28, 2023, 8:06 PM IST

मणिपूर हिंसाचार संदर्भात, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी माहिती दिली आहे, की राज्यातील विविध भागात सुमारे 30 दहशतवादी मारले गेले आहेत. यासोबतच काही दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलांनी अटक केली आहे. सीएन बिरेन सिंह म्हणाले की, ही कारवाई दहशतवादी गटांविरुद्ध प्रति आणि बचावात्मक कारवाईचा भाग म्हणून करण्यात आली आहे.

Terrorists Killed in Manipur
Terrorists Killed in Manipur

इंफाळ : ईशान्येकडील राज्यात काही आठवड्यांपूर्वी सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान सुरक्षा दलांनी मणिपूरच्या विविध भागात 'प्रत्युत्तर कारवाईत सुमारे 40 'दहशतवाद्यांना' ठार केले आहे, असे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी रविवारी सांगितले. नागरिकांच्या विरोधात अत्याधुनिक शस्त्रे वापरणाऱ्या या दहशतवादी गटांविरुद्धच्या संरक्षणात्मक कारवाईत, यापैकी सुमारे 40 दहशतवादी वेगवेगळ्या भागात मारले गेले आहेत. काहींना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे.रविवारी मणिपूरमध्ये अर्धा डझनहून अधिक ठिकाणी सशस्त्र गट, सुरक्षा दलांमध्ये ताज्या चकमकी झाल्या आहेत.

लष्कराची कारवाई सुरूच : मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर पोलिस आणि लष्कराची कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या कारवायांमध्ये 30 दहशतवादी मारले गेले आहेत. ज्याची माहिती खुद्द मणिपूर सरकारनेच शेअर केली आहे. मात्र, मणिपूरमधील परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. हिंसाचाराच्या बातम्या रोज पहायला मिळत आहेत.

30 दहशतवाद्यांचा खात्मा : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दावा केला की, राज्यातील विविध भागात 30 दहशतवादी मारले गेले आहेत. यासोबतच काही दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलांनी अटक केल्याचे त्यांनी सांगितले. सीएन बिरेन सिंग यांनी माहिती दिली की, ही कारवाई दहशतवादी गटांविरुद्ध कारवाईचा सरु आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दावा केला की, दहशतवादी एके-47 आणि स्नायपर गनने नागरिकांवर हल्ले करत आहेत. इतकेच नाही तर अनेक गावात घरे पेटवायलाही आले होते. ज्यांच्या विरोधात लष्कर आणि सुरक्षा दलाच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. मणिपूर सरकारने माहिती दिली की, या दहशतवादी गटांविरुद्ध अत्याधुनिक शस्त्रे वापरून नागरी लोकसंख्येविरुद्ध केलेल्या काउंटर, डिफेन्सिव्ह ऑपरेशनमध्ये सुमारे 30 दहशतवादी वेगवेगळ्या भागात मारले गेले आहेत. काहींना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे.'

विविध जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी : शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याने समुदायांना शस्त्रमुक्त करण्यासाठी कारवाई सुरू केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. इंफाळ पश्चिम येथील उरीपोक येथील भाजप आमदार खवैराकपम रघुमणी सिंह यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या दोन वाहनांना आग लावण्यात आली, असे पीटीआयने एका उच्च सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. पहाटेच्या सुमारास इम्फाळ खोऱ्याच्या आजूबाजूच्या विविध जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. काकचिंगमधील सुगनू, चुराचंदपूरमधील कांगवी, इंफाळ पश्चिममधील कांगचूप, इम्फाळ पूर्वमधील सगोलमांग, बिशेनपूरमधील नुंगोइपोकपी, इंफाळ पश्चिममधील खुरखुल आणि कांगपोकपीमधील YKPI येथे गोळीबार झाल्याचे वृत्त आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.

चकमकीत कमांडो जखमी : रविवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील किमान चार जिल्ह्यांमधून सुरक्षा दल आणि सशस्त्र गटांमधील चकमकीच्या अनेक घटना घडल्या, ज्यात दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. इंफाळमधील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चुराचंदपूर, ककचिंग, इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमधून चकमकीचे वृत्त प्राप्त झाले आहे. या चकमकीत मणिपूर पोलिसांचे अनेक कमांडो आणि अज्ञात सशस्त्र गटाचे सदस्य जखमी झाले. जखमी पोलीस कमांडोना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सशस्त्र गटांची ओळख तात्काळ कळू शकली नाही. या घटनांच्या अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात : परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व विस्कळीत जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी शिथिलता कालावधी तीन तासांनी कमी केला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये येते. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय गुरुवारपासून संकटग्रस्त मणिपूर आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे शनिवारपासून दौऱ्यावर आहेत. नागरी समाज संघटनांसह विविध भागधारकांसोबत बैठका घेतल्या जात आहेत.

अमित शहा मणिपूर दौऱ्यावर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी तीन दिवसांसाठी मणिपूरला जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात. ते मेईतेई आणि कुकी समुदायांसह सर्व समुदायांच्या प्रतिनिधींना भेटण्याची शक्यता आहे. ईस्टर्न कमांडचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल आर.पी. कलिता यांनी 22 ते 24 मे या कालावधीत मणिपूरमधील अनेक संवेदनशील, संमिश्र लोकसंख्येच्या जिल्ह्यांना भेटी देऊन जमिनीवरील वास्तवाचा आढावा घेतला. हिंसक घटनांदरम्यान, मणिपूर सरकारने शनिवारी अफवा आणि व्हिडिओ, फोटो आणि संदेश यांचा प्रसार रोखण्यासाठी इंटरनेट बंद केले आहेत.

70 जणांचा मृत्यू : मणिपूरच्या ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने 3 मे रोजी 'आदिवासी एकता मोर्चा' काढला होता. मेईतेई समुदायाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यामुळे ईशान्य राज्यातील 10 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हिंसक संघर्ष सरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Last Updated : May 28, 2023, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.