ETV Bharat / state

दुबईला जाणाऱ्या केआरकेला विमानतळावर अटक, जीवाला धोका असल्याचा केली पोस्ट

author img

By PTI

Published : Dec 26, 2023, 10:04 AM IST

KRK arrested at airport
दुबईला जाणाऱ्या केआरकेला विमानतळावर अटक

KRK arrested at airport : वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे नेहमी चर्चेत राहणारा कमाल आर खान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दुबईला निघाला होता. त्याला विमानतळावरच ताब्यात घेण्यात आलं. वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर त्याला एका जुन्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. आता त्याला पोलिसांनी सोडून दिले असले तरी आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं म्हटलंय.

मुंबई - KRK arrested at airport : अभिनेता कमाल आर खानला सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका जुन्या तक्रारीबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही महिला कलाकार आणि मॉडेल्सच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी त्यांच्यावर एक जुनी केस प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला वर्सोवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि त्याला जाण्याआधी नोटीस बजावण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 2016 च्या प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या लुकआउट परिपत्रकाच्या (LOC) आधारावर कमाल आर खानला ट्विटरवर (आता X) डझनहून अधिक अभिनेत्री आणि मॉडेल्स विरुद्ध अश्लील आणि असभ्य मजकूर पोस्ट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. "कमाल आर खानला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याला नोटीस बजावल्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली," असे अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.

दुबईला जात असताना केआरकेला अटक

केआरकेने त्याच्या X (ट्विटर) अकाऊंटवर लिहिले आहे की, “मी गेल्या एक वर्षापासून मुंबईत राहात आहे. मी माझ्या कोर्टाच्या तारखाांसाठी नियमितपणे हजर राहतो. आज मी नवीन वर्षासाठी दुबईला जाणार होतो. पण मुंबई पोलिसांनी मला विमानतळावर ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 च्या एका गुन्ह्यात मी त्यांना हवा आहे. माझ्यामुळे त्याचा 'टायगर 3' हा चित्रपट फ्लॉप झाल्याचं सलमान खान म्हणत असतो. कोणत्याही परिस्थितीत माझा मृत्यू जर पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात झाला तर तो खून आहे हे तुम्हाला समजायला हवे आणि याला जबाबदार कोण आहे हे तुम्हा सर्वांना माहित असले पाहिजे.''

KRK arrested at airport
जीवाला धोका असल्याचा केआरकेची पोस्ट

कोण आहे केआरके?

कमाल रशीद खान हा स्वयंघोषित समीक्षक म्हणून कोणत्याही चित्रपटाबद्दल भाष्य करण्यात पुढाकार घेतो. विशेषतः सलमान खानच्या चित्रपटावर तो सातत्यानं टीका करत आला आहे. त्यानं हिंदी आणि भोजपुरी भाषेतून चित्रपटात अभियनही केला आहे. खरंतर अभिनय प्रतिभा नसली तरी सातत्यानं चर्चेत राहण्याची कला त्याच्याकडे आहे. यासाठी अनेक वादही तो स्वतःवर ओढवून घेतो. मुख्य अभिनेता म्हणून 'देशद्रोही' या एकमेव चित्रपटात त्यानं काम केलं होतं. 'एक व्हिलन' या चित्रपटातही सहाय्यक अभिनेता म्हणून झळकला होता. त्यानं 2009 मध्ये बिग बॉस या रिआलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

हेहा वाचा -

  1. अरबाज खानने शुरा खानसोबत लग्न केल्यानंतर मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट
  2. 'मैं अटल हूं' चित्रपटातील देशभक्तीपर "देश पेहले" हे गाणं लॉन्च
  3. अरबाज खानच्या लग्नात सलमान खानचा नवविवाहित वधू आणि अरहान खानसोबत डान्स
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.