ETV Bharat / state

गेल्या सात महिन्यात 'मॅनहोल'ची 400 झाकणं गायब, मुंबईत 50 हून अधिक गुन्हे दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 9:11 PM IST

बीएमसीच्या अखत्यारीत येणाऱ्या मॅनहोल तथा गटारांची उघडी तोंडे झाकण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, दुसरीकडे या झाकणांची वाढती चोरी पालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. यावर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत 400 झाकणांची चोरी झाली आहे. मुंबईत 50 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Manhole Cover Theft Mumbai
मॅनहोलची 400 झाकणं गायब

मुंबई: मॅनहोलच्या झाकणांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मात्र चोरट्यांमुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहेत. मॅनहोल तथा गटारांची उघडी तोंडे झाकण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. दुसरीकडे हे झाकण चोरी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढतच आहेत. यावर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत 400 झाकणांची चोरी झाली आहे. दर महिन्याला सरासरी 57 झाकणांची चोरी झाली आहेत. सर्वाधिक गुन्हे अज्ञातांविरुद्ध दाखल आहेत, ही बाब गंभीर आहे.

बीएमसीवर हलगर्जीपणाचा ठपका: महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा हा परिणाम असल्याचे जाणकारांचे मत आहे. झाकण टाकल्यानंतर पर्यवेक्षणात महापालिकेचा हलगर्जीपणा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महापालिकेने विभागनिहाय तपासणीची व्यवस्था केल्यास मॅनहोलच्या झाकणांच्या चोरीला आळा बसू शकतो. यासोबतच नाल्यांच्या उघड्या तोंडात पडून अपघात होणार नाहीत. नियम कडक केले आहेत. चोरटे अज्ञात असताना कोणावर कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण होतोय. त्या आरोपींचा शोध घेणं पोलिसांना जिकरीचे काम होतं आहे.

सापळा रचून आरोपींना अटक: सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने 11 ऑगस्टला वाकोला पुलावरून मॅनहोलवरील लोखंडी झाकण चोरीला गेले होते. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत कुर्ल्यासह इतर ठिकाणीही असेच गुन्हे घडल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन अतुल व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.

चोरी प्रकरणी तिघांना अटक: सांताक्रुज येथील तीन आरोपींना अटक सांताक्रूझचे वाकोला येथील मॅनहोल झाकण चोरीचे ताजे प्रकरण आहे. याप्रकरणी अनिल वर्मा (वय ३४), अनिल केवट (वय २७) आणि शाहनवाज शेख (वय २६) यांना अटक करण्यात आल्याचे वाकोल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी सांगितले. तपास अधिकारी सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वर्मा हा ऑटोरिक्षा चालक असून केवट हा भाजीविक्रेता आहे. तिसरा आरोपी शाहनवाज हा बेरोजगार आहे.

चौघांना अटक: 22 जूनला प्राजक्ता धवणे, आर/मध्यम प्रभाग अधिकारी यांनी एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. झाकण चोरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कमलेश उर्फ बंटी जगदीश सोलंकी (२९) याला अटक केली होती. चोरीचे कव्हर विकत घेणारा अब्दुल गनी मोहम्मद नजीर शाह (51) या भंगार व्यापारीलाही अटक करण्यात आली आहे. जूनमध्येच गावदेवी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सागीर अब्बास सय्यद (वय 22, रा. मुंबा) आणि इम्रान अक्रम शेख (वय 23, रा. वरळी) यांना अटक करण्यात आली.

इतक्या झाकणांची चोरी: 2020 मध्ये 458 चोरीस गेलेली झाकणं होती. 374 झाकणं महापालिकेने दुरुस्ती केली होती. 2021 मध्ये 564 झाकणं चोरीस गेली होती तर 390 झाकणा महापालिकेने दुरुस्त केली होती. त्याचप्रमाणे 2022 मध्ये 836 झाकणे चोरीस गेली होती तर 530 महापालिकेने दुरुस्त केली होती. तसेच 2023 मध्ये गेल्या सात महिन्यात 400 झाकणे चोरीस गेली असून महापालिकेने 145 झाकणे दुरुस्ती केली आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai HC On Potholes : खड्डेमुक्तीसाठी चक्क हायकोर्टाने कसली कंबर, मुंबई-ठाण्यासह आसपासच्या सर्वच आयुक्तांना लावले कामाला
  2. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मानखुर्द चेंबूर विभागाचा पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार 24 तास बंद
  3. BMC On MLA Waikar Hotel Constriction : आमदार रवींद्र वायकर यांनी बांधकाम करण्यापूर्वी कळवले नसल्यामुळे स्थगिती; महापालिकेचा खुलासा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.