ETV Bharat / state

Raju Shetty Agitation in Kolhapur : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करायचा ? राजू शेट्टींचा सवाल

author img

By

Published : Mar 5, 2022, 4:29 PM IST

Updated : Mar 5, 2022, 5:29 PM IST

एकीकडे बळीराजाला साप चावून त्याचा मृत्यू झाल्याच्या दररोज अनेक घटना घडत असतात. त्याला सरकारच जबाबदार आहे. मात्र, आपल्या कार्यालयांमध्ये साप काय आले लगेच गुन्हे दाखल करता? आमच्या शेतकऱ्यांचे साप आणि प्राण्यांमुळे ( death of farmers due to snake bite ) मृत्यू होतात. त्यासाठी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशाराही शेट्टींनी ( Raju Shetty warning of farmers death ) दिला आहे.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनानंतर राज्यभरातील शेतकरी जवळच्या शासकीय कार्यालयांमध्ये साप सोडत ( Swabbhimani Shetkari Sanghata Agitation ) असल्याची घटना घडल्या आहेत. तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यंत अनेक कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांनी साप सोडले. त्या घटनेनंतर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात ( police case against farmers ) आले आहेत. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी चांगलेच संतापले आहेत.

एकीकडे बळीराजाला साप चावून त्याचा मृत्यू झाल्याच्या दररोज अनेक घटना घडत असतात. त्याला सरकारच जबाबदार आहे. मात्र, आपल्या कार्यालयांमध्ये साप काय आले लगेच गुन्हे दाखल करता? आमच्या शेतकऱ्यांचे साप आणि प्राण्यांमुळे ( death of farmers due to snake bite ) मृत्यू होतात. त्यासाठी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशाराही शेट्टींनी ( Raju Shetty warning of farmers death ) दिला आहे.


हेही वाचा-Disha Salian Case : मालवणी पोलिसांसमोर राणे पिता-पुत्र हजर; जवाब नोंदवणार


मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री की आणखी कोणावर गुन्हा दाखल करू ?
राजू शेट्टी म्हणाले, आपल्या कार्यालयात साप सोडले म्हणून सरकारी कामात अडथळा तसेच जीवे मारण्याकरिता प्रयत्न या कलमाखाली शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना रात्री अपरात्री वीज मिळते. त्याचवेळी साप तसेच जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी मृत्युमुखी पडतात. त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री उर्जामंत्री की महावितरणचे अधिकारी ? असा सवालसुद्धा शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला कायदा वेगळा आणि आम्हाला वेगळा, हे भविष्यात चालणार नाही, असा दमसुद्धा त्यांनी दिला.

हेही वाचा-Sharad Pawar in Pune : पंतप्रधान मोदी अर्धवट कामाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येताहेत
गेल्या 11 दिवसांपासून शेट्टी यांचे आंदोलन
दरम्यान, शेतीला दिवसा 10 तास सलग वीज मिळावी तसेच वाढीव वीजबिल तात्काळ दुरुस्त करून मिळावे आणि विजतोडणी बंद व्हावी या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूरातील महावितरण कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. स्वतः राजू शेट्टी हे या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत. काल राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आजचा बारावा दिवस आहे मात्र सरकारकडून अध्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाहीये. त्यामुळे जोपर्यंत कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

Last Updated : Mar 5, 2022, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.