ETV Bharat / state

Ajit pawar in Kolhapur: पुण्यातील बैठकीत लपून गेलेलो नाही, त्या गाडीत मी नव्हतो-अजित पवार

author img

By

Published : Aug 15, 2023, 2:15 PM IST

Updated : Aug 15, 2023, 2:28 PM IST

राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त बैठकीनंतर राज्यभरात चर्चेला उधाण आले होते. या बैठकी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मी कोणत्याही गुप्त बैठकीला गेलेलो नाही. त्या गाडीमध्ये मी नव्हतो. ती गाडीही माझी नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. कोल्हापुरातील पत्रकारांशी आज ते बोलत होते.

Ajit pawar in Kolhapur
उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील बैठकीसंदर्भात अजित पवारांनी यू टर्न घेतल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. पुण्याच्या बैठकीचे काही मनावर घेऊ नका, शरद पवार हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, मी कुठेही लपून गेलो नाही, मी कधी लपून गेलो सांगा ना? चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. त्या गाडीत मी नव्हतो. जयंत पाटील देखील त्याठिकाणी शरद पवार साहेब यांच्यासोबत होते. दोन पिढ्या ओळख असलेल्या व्यक्तीच्या घरी जाणे काय चुकीचे आहे, असा सवाल अजित पवार यांनी माध्यमांसोबत बोलताना उपस्थित केला.

अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्या नेतृत्वात विकासाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

महायुतीचे सरकार राज्यात गतिमान : राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती सुरू आहे. महायुतीचे सरकार राज्यात गतिमान काम करत आहे. यंदा कोल्हापुरात समाधानकारक पाऊस असला, तरी राज्यातील अनेक भागात अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन बळीराजाला चांगले दिवस येतील, असा आशावादही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.


काम युद्धपातळीवर करणार : गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूर महापालिकेचे आयुक्तपद रिक्त आहे. त्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या कामांना ब्रेक लागला आहे. मुंबईला गेल्यावर तात्काळ कोल्हापूर महापालिकेसाठी चांगला आयुक्त देऊन शहराच्या प्रश्नांचे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. कोल्हापुरातील काळमवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. धरणाचे पाच टीएमसी पाणी गळतीमुळे वाया जात आहे. यासाठी सुमारे 80 कोटींचा निधी लागणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात तात्काळ जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक करून काळमवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न दोन वर्षात निकाली काढण्याचा प्रयत्न आहे, असे पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Independence Day 2023: ना अजित पवार, ना चंद्रकांत पाटील.. पुण्यातील विधानभवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण
  2. Ajit Pawar Meeting Issue: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील बैठकीत प्रचंड गोंधळ, पाहा व्हिडीओ
  3. Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting : काका-पुतण्यांची गुप्त बैठक; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले...
Last Updated : Aug 15, 2023, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.